Karnataka Election 2023, Congress Vs BJP, Mallikarjun Kharge SAAM TV
देश विदेश

Congress Vs BJP : मल्लिकार्जुन खरगेंसह कुटुंबीयांच्या हत्येचा भाजपचा कट; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Karnataka Election 2023, Congress Vs BJP : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्याचा भाजपचा कट आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

Nandkumar Joshi

Karnataka Election 2023, Congress Vs BJP : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्याचा भाजपचा कट आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. सुरजेवाला यांनी एका कथित ऑडियो क्लिपच्या आधारे भाजपवर हा आरोप केला आहे.

चित्तपूर येथील भाजप नेत्याने कथितरित्या मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्याबाबत वक्तव्य केल्याचा दावा आहे. मोदींचा चाहता या कटामागे असल्याचेही सुरजेवाला म्हणाले. (Breaking Marathi News)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, सुरजेवालांनी केलेल्या या दाव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

चित्तपूर येथील भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या हत्येबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसवराज बोम्मईंचे नीकटवर्तीय आहेत, असा काँग्रेसचा दावा आहे. खरगे यांच्या कुटुंबीयांना संपवून टाकणार असं तो उमेदवार कथित ऑडियो क्लिपमध्ये म्हणत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

भाजप उमेदवारावर ४० हून अधिक गुन्हे

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटल हँडलवरील ट्विटमध्ये केलेल्या दाव्यानुसार, भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांच्यावर हत्येचा प्रयत्न, रेशनवरील धान्याची अवैध वाहतूक, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांस्त्रांची तस्करी, धमक्या देणे आदी गुन्हे त्यांच्यावर आहेत.

भाजप द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राज्यात पराभव होईल अशी भीती भाजपला सतावते आहे. त्यामुळे हे सरकार खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट आखत आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT