bjp mp diya kumari claims that tajmahal build on our family land  Saam Tv
देश विदेश

ताजमहल आमची संपत्ती; भाजपच्या 'या' नेत्याचा दावा

Taj Mahal Row : ताजमहल आमच्या संपत्तीचा हिस्सा आहे, असा दावा जयपूरच्या राजघराण्याने केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयपूर : ताजमहल (Taj mahal) जगातलं सातवं आश्चर्य आहे. जगभरातून लोक ऐतिहासिक आणि सुंदर वास्तू असलेले ताजमहल पाहण्यासाठी भारतात येत असतात. हेच सुंदर ताजमहल आमच्या संपत्तीचा हिस्सा आहे, असा दावा जयपूरच्या राजघराण्याने केला आहे. जयपूरच्या राजघराण्यातील राजकन्या आणि भाजप खासदार दिया कुमारी यांनी हा दावा केला आहे. ताजमहल हे आमच्या पॅलेसच्या जमिनीवर उभं केलं आहे. त्याचे कागदपत्रेही आमच्याजवळ आहे. आमच्या त्या जमिनीवर शाहजहाने अतिक्रमण केलं होतं, असा दावा खासदार दिया कुमारी यांनी केला आहे. ( Taj Mahal Row News in Marathi )

हे देखील पाहा -

दिया कुमारी पुढे म्हणाल्या की, ' शाहजहाने आमचा पॅलेस आणि जमिनीवर बळजबरीनं अतिक्रमण केलं. त्यावेळी मुघलांचे सरकार होतं. त्यामुळं त्यांचा विरोध करू शकलो नाही. आजच्या काळात कोणत्याही सरकारने जमिनीचं संपादन केले तर त्याबदल्यात नुकसान भरपाई मिळते. मात्र,त्या काळात आम्हाला काहीच भरपाई मिळाली नाही. तसा कायदाही त्या काळात नव्हता. त्यामुळे त्याचा विरोधही करू शकलो नाही. मात्र, त्या प्रकरणावर कोणीतरी आता आवाज उचलला आहे. कोर्टात याचिकाही दाखल केली आहे.

पुढे दिया कुमारी म्हणाल्या की, आता ताजमहलामधील बंद खोल्या उघडल्या पाहिजे. जेणेकरून समजून येईल की, ताजमहलाच्या आधी तिथं काय होतं. मात्र, ताजमहल तोडा असे मुळीच म्हणणं नाही आहे. ताजमहलाच्या बंद खोल्या उघडल्या पाहिजे. तसेच ताजमहलात अशा काही खोल्या आहेत, ज्या खूप दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निश्चित चौकशी झाली पाहिजे'. कोर्टात राजघरणाच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात येईल का, या प्रश्नावर उत्तर देताना दिया कुमारी म्हणाल्या की, आम्ही आता पाहत आहोत. सर्व बाबींचा विचार करून ताजमहलासाठी पाऊल उचलू'. असं त्या म्हणाल्या.

ताजमहल प्रकरण काय आहे ?

ताजमहलासाठी उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद उच्च न्यायालयात अयोध्याच्या (Ayodhya) भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी याचिका दाखल केली आहे. डॉ. सिंह यांनी याचिकेत ताजमहलातील २२ खोल्यांची भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या माध्यमातून सर्व्हे करण्याची मागणी केली आहे. या खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांची मुर्त्या असू शकतात, असा याचिका कर्त्यांच्या दावा आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT