BJP MLA POOJA PAL CYBER FRAUD saam tv
देश विदेश

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक अन् खात्यातून 1.55 लाख गायब

BJP MLA Pooja Pal Cyber Fraud 1.55 Lakh UPI Transaction: उत्तर प्रदेशातील भाजप आमदार पूजा पाल यांच्या बँक खात्यातून UPIच्या माध्यमातून 1.55 लाख रुपये परस्पर काढण्यात आले. मोबाइल हॅक झाल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि आमदार पूजा पाल यांच्यासोबत सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या बँक खात्यातून UPIच्या माध्यमातून तब्बल 1.55 लाख रुपये परस्पर काढण्यात आल्याचे समोर आले आहे. मोबाइल हॅक करून ही रक्कम काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पूजा पाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धूमनगंज येथील यूबीआय शाखेत त्यांचे बँक खाते आहे. 22 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या खात्यातून UPIच्या माध्यमातून अनेक वेळा रक्कम काढण्यात आली. 14 सप्टेंबर रोजी या व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर बँक खात्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तब्बल 1.55 लाख रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

पूजा पाल यांनी आपल्या तक्रारीत त्यांच्या आयफोन हॅक करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मोबाइलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर त्यांच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय UPIच्या माध्यमातून खात्यातील रक्कम काढण्यात आल्याचा संशय आहे. मोबाइलमध्ये असलेल्या वैयक्तिक आणि महत्त्वाच्या डेटा देखील गायब झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धूमनगंज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून 22 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान झालेल्या सर्व UPI व्यवहारांची, UTR क्रमांकांची आणि ट्रान्झॅक्शन आयडींची तपासणी केली जात आहे. सायबर सेलच्या मदतीने मोबाइल, UPI आणि बँकिंग सुविधांमध्ये अनधिकृत प्रवेश कसा झाला, याचाही तपास सुरू आहे. संशयित व्यक्ती, डिव्हाइस आणि UPI आयडीची ओळख पटवून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही सायबर फसवणुकीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांसह चार जणांच्या खात्यातून एकूण 8.01 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये ग्रीन गॅस कर्मचारी आणि पीएनबी कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली, तर एका प्रकरणात आरटीओ चालानच्या नावाने लिंक पाठवून खाते रिकामे करण्यात आले. चारही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्रान्समध्ये विद्यार्थी आंदोलनाचा भडका, ट्रम्प यांच्या विधानानं जनतेत संताप

थायलंडच्या तरूणीला 60 लाखांचा गंडा, अविवाहित असल्याचं सांगून तरूणीशी विवाह

महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम

दुष्काळामुळे राज्यात पाणी प्रश्न गंभीर, धरणांवर आता पोलिसांचा पहारा

Latest Blouse Designs: नवरात्रीनिमित्त घागरा चोलीसाठी शिवा स्टायलिश ब्लाऊज, लेटेस्ट 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT