Manipur Imphal West grenade blast latest news साम टीव्ही
देश विदेश

भाजप नेत्याला उडवण्याचा प्रयत्न, आमदाराच्या घरावर ग्रेनेड फेकले, राजकारणात खळबळ

grenade attack on BJP MLA Sapam Ranjan Singh house : मणिपूरमध्ये भाजप आमदार डॉ. सपम रंजन सिंह यांच्या इम्फाल वेस्ट येथील निवासस्थानी ग्रेनेड स्फोट झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

Namdeo Kumbhar

Manipur Imphal West grenade blast latest news : मणिपूरमध्ये भाजपचे आमदार डॉ. सपम रंजन सिंह यांच्या इम्फाल वेस्ट येथील निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री अचानक ग्रेनेड (बॉम्ब) स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी स्वतः आमदारांच्या घरी भेट देऊन पाहणी केली आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मणिपूरमधील कोंथौजम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. सपम रंजन सिंह यांच्या इम्फाल वेस्ट येथील निवासस्थानी गुरुवारी (२८ ऑगस्ट) मध्यरात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास जोरदार ग्रेनेड स्फोट झाला. हा स्फोट आमदाराच्या घराच्या मागच्या बाजूला झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या परिसरातील लोक घाबरून घराबाहेर आले.

दिल्लीहून परतताच झाला हल्ला

आमदार डॉ. सपम रंजन सिंह हे घटनेच्या आदल्या दिवशीच दिल्लीहून परतले होते. मणिपूरमधील परिस्थितीबाबत त्यांनी दिल्लीत केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीहून परतताच काही तासांतच त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कोणाशीही वैयक्तिक शत्रूता नव्हती आणि त्यांना आधी कोणतीही धमकीही मिळाली नव्हती.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी दुपारी आमदार सपम रंजन सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी तपासाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत याला "लोकशाहीवरील हल्ला" म्हटले आहे आणि गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिले.

स्थानिक महिलांचे मुख्य दारावर धरणे आंदोलन

या हल्ल्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. घटनेनंतर कोंथौजम परिसरातील स्थानिक महिलांनी आमदारांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून शांततापूर्ण धरणे आंदोलन केले. अशा हिंसक घटनांवर प्रशासनाने त्वरित आणि कठोर आळा घालावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, या स्फोटामागे नक्की कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सात धरणे तुडुंब

रोजच्या 8 सवयी ज्या डोळ्यांसाठी घातक, वेळीच घ्या काळजी, नाहीतर...

Boiled Egg Peeling: उकडलेले अंडे सोलताना तुटतेय? 'या' सोप्या ट्रिकने काही सेकंदात निघेल कवच

Typing Side Effects : कॉम्प्युटरवर तासन्‌तास टायपिंग करणं ठरू शकतं महागात, शरीराला जखडतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT