भाजप आमदाराला जुगार खेळताना रंगेहाथ अटक; 7 तरुणींचा समावेश Saam Tv
देश विदेश

भाजप आमदाराला जुगार खेळताना रंगेहाथ अटक; 7 तरुणींचा समावेश

गुजरात मध्ये एका भाजप आमदाराला जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंचमहाल: देशात सध्या कोरोना Corona विषाणूची लाट अजून ओसरली नाही. नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. असे असूनही काही राजकीय नेते Political leaders कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. अशातच एका भाजप BJP आमदाराला MLA जुगार खेळताना पोलिसांनी Police अटक केली आहे. BJP MLA arrested for gambling in Gujrat

पंचमहाल Panchmahal पोलिसांनी कारवाई करत एका आमदारासह अन्य 25 जणांना रंगेहाथ पकडले आहे. संबंधित सर्व आरोपी आमदाराच्या एका रिसॉर्टमध्ये Resort एकत्र जमले होते आणि जुगार Gambling खेळत होते. आश्चर्य म्हणजे यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. तर याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

हे देखील पहा-

केसरी सिंह सोलंकी Kesari Singh Solanki असे संबंधित अटक केलेल्या आमदाराचे नाव आहे. हे आमदार गुजरातमधील खेडा जिल्ह्याच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. पोलिसांनी काल रात्री केलेल्या छापेमारीत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आमदाराला जुगार आणि रिसोर्टमध्ये मद्यसाठा ठेवण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अवैधरित्या जुगार खेळणं, कोरोना नियमांचे उल्लंघन आणि दारू बाळगणे अशा विविध कलमांतर्गत पंचमहाल जिल्हा पोलिसांनी आमदारासह २५ जणांना अटक केली आहे. ७ महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे. BJP MLA arrested for gambling in Gujrat

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजदीपसिंग जडेजा यांनी याप्रकरणी माहिती दिली की, गुरुवारी रात्री पावागड शहरालगत असलेल्या एका रिसॉर्टवर पंचमहाल पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत आमदार केसरीसिंग सोलंकी यांच्यासह २५ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. “आम्हाला सोलंकी आणि इतर २५ जण जुगार Gambling खेळताना आढळले होते. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या Alcohol Bottels आणि कसीनोचे सामान जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढू शकतात.

७ महिला आणि १८ पुरुषांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान ७ मद्याच्या बाटल्याही पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. रिसॉर्टमध्ये जुगार खेळत मद्य पार्टीत गुंग असताना याचवेळी पोलिसांनी हा छापा टाकला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT