Body of BJP leader Vijay Tiwari found inside his shop in Kanpur Dehat under mysterious circumstances. saam tv
देश विदेश

भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शेताला पाणी देऊन आलो म्हणाले अन् दुकानात आढळला मृतदेह, राजकारणात खळबळ

BJP leader Vijay Tiwari Found Dead In Shop Kanpur Dehat: कानपूर देहातमध्ये भाजप सेक्टर संयोजक विजय तिवारी यांचा संशयास्पद मृत्यू. शेताला पाणी देण्यासाठी गेले होते, मात्र दुकानात मृतदेह आढळल्याने खळबळ.

Omkar Sonawane

कानपूरच्या देहात जिल्ह्यातील मंगळपुर पोलीस ठाणे हद्दीतील किशौरा गावात रविवारी भाजपचे सेक्टर संयोजक विजय तिवारी यांचा मृतदेह त्यांच्या दुकानात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.

विजय तिवारी हे किशौरा गावचे रहिवासी असून महंत बिल्डिंग मटेरियल या नावाने ते स्वतःचे दुकान चालवत होते. ते भारतीय जनता पक्षाचे सेक्टर संयोजक म्हणूनही सक्रिय होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शनिवारी त्यांनी घरातून शेतातील धान पिकाला पाणी घालण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते दुकानात कधी गेले किंवा तेथेच थांबले का, याबाबत कोणालाही माहिती नाही.

रविवारी सकाळी त्यांचा मुलगा गौरव तिवारी यांनी दुकानाचे शटर उघडले असता आत वडिलांचा मृतदेह पडलेला आढळला. ही घटना समोर येताच कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश पसरला. तातडीने त्यांना झींझक येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. झींझक चौकीचे प्रभारी अवनीश वर्मा यांनी सांगितले की, त्यांना अद्याप घटनेची माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मृत विजय तिवारी यांच्या पश्चात पत्नी मीरा देवी, पुत्र सूर्यकांत तिवारी व गौरव तिवारी, तसेच भाऊ अजय कुमार आणि अनुरुद्ध कुमार असा मोठा परिवार आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण पसरले असून मोठ्या संख्येने लोक कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी भेट देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथे घेतली जखमींची भेट

टीम इंडियाचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; क्रांतीच्या पंचने इंग्लंडचा धुव्वा

महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? ज्यासाठी मराठ्यांनी लढली पहिली 'मैदानी लढाई’

Office Tips : तुमचा बॉस सुट्टी देत नसेल तर वापरा 'ही' ट्रिक, एकही प्रश्न न विचारता मिळेल रजा

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह, कुणी पाठवली नोटीस? आता पुढे काय?

SCROLL FOR NEXT