BJP News
BJP News Saam Tv
देश विदेश

BJP News : भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोर फरार

Shivani Tichkule

West Bengal News : पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर येत आहे. पूर्व बर्धमान जिल्ह्यात शनिवारी रात्री भाजप नेते राजू झा यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू झा आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कोलकात्याला जात होते. त्याचवेळी शक्तिगढ परिसरातील एका मिठाईच्या दुकानाबाहेर त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. (Latest Marathi News)

जेव्हा गोळीबार झाला तेव्हा राजू हे आपल्या कारमध्ये बसले होते. त्याचवेळी दोन आरोपी कारमधून राजू यांच्या वाहनाजवळ आले, त्यातील एकाने रॉडच्या मदतीनं राजू यांच्या कारच्या काच्या फोडल्या तर दुसऱ्याने त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. राजू झा यांना एकूण पाच गोळ्या लागल्या. या घटनेत राजू झा यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये राजू झा यांच्यासह तीन जण प्रवास करत होते. आरोपींनी यावेळी अनेक राऊंड फायर केले. या घटनेत राजू यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (BJP News)

आरोपी घटनास्थळावरून फरार

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. डाव्या आघाडीच्या राजवटीत झा यांच्यावर सिलपंचालमध्ये अवैध कोळसा व्यवसाय चालवल्याचा आरोप होता. तृणमूल सरकारमध्येही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र हल्लेखोरांनी राजू झा यांच्यावर गोळीबार का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha News : 1 मिनिट बाकी असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला! अनिल जाधवांच्या माघारीनं कुणाला दिलासा?

Honeymoon Dress Ideas: हनिमूनसाठी हटके ड्रेस आयडिया

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

Nashik Loksabha: फक्त १ मिनीट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार... बंडखोर अनिल जाधवांमुळे नेते कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT