BJP
BJP  saam tv
देश विदेश

Karnataka BJP Leader Killed: भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, कर्नाटकात निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं

साम टिव्ही ब्युरो

Karnataka BJP Leader Killed: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्नाटकात भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. धारवाडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

मंगळवारी धारवाड परिसरात रात्रीच्या वेळी एका धार्मिक मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीदरम्यान किरकोळ भांडणातून काही जणांनी भाजप युवा नेता प्रवीण कम्मर यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रविण गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Crime News)

प्रवीण कम्मर हे भाजप युवा मोर्चाचे नेते तसेच कोत्तूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच देखील होते. मिरवणुकीदरम्यान झालेल्या भांडणानंतर तेथे वाद सोडवण्यासाठी प्रविण तेथे गेले होते. मात्र हल्लेखोरांनी प्रविण यांच्यावरही हल्ला केला.  (Latest Marathi News)

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. प्रवीण कमर यांची हत्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, अत्यंत दुःखद अंतकरणाने आम्ही प्रवीण कमर यांच्या हत्येची माहिती देत ​​आहोत. मंगळवारी रात्री उशिरा संशयित राजकीय विरोधकांनी त्यांची निर्घृण हत्या केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांसाठी आज सोन्यासारखा दिवस

Rashi Bhavishya : अक्षय तृतीयाला जुळून आला खास योग; ‘या’ राशींचे नशीब चंद्रासारखे चमकणार, वाचा राशिभविष्य

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया सणाला आहे खास महत्व; तुम्हाला आहे का ही माहिती? जाणून घ्या

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

SCROLL FOR NEXT