BJP Saam
देश विदेश

BJP: भाजपच्या बड्या नेत्याला हॉस्पिटलमध्ये मारहाण; ज्युनियर डॉक्टरांनी बेदम मारलं, महिला डॉक्टरांशी असभ्य वर्तन..

BJP Leader Hospital Attack news: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यावर ज्युनियर डॉक्टरांकडून मारहाण करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पाटणा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल येथे घडली असून, महिला डॉक्टरांशी झालेल्या वादानंतर रूग्णालयातील ज्युनियर डॉक्टरांनी मनीष कश्यपला मारहाण केली आहे. या घटनेनंतर मनीष कश्यप आणि डॉक्टरांचे समर्थक पोलीस ठाण्यात पोहोचले. सध्या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत असून, पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पीएमसीएचमधील डॉक्टरांच्या माहितीनुसार, मनीष कश्यप एका रूग्णाच्या वतीने तक्रार मांडण्यासाठी रूग्णालयात आले होते. यावेळी त्यांचा महिला डॉक्टरांशी वाद झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मनीष यांनी महिला डॉक्टरांसोबत असभ्य वर्तन केले. ज्यामुळे संतप्त झालेल्या ज्युनियर डॉक्टरांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे मनीष कश्यप यांच्या समर्थकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्याही महिला डॉक्टरशी गैरवर्तन झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मनीष यांच्यावर कारण नसताना हल्ला करण्यात आला आहे. या झटापटीत त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. कश्यप यांच्या समर्थकांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, हल्ल्यानंतर कश्यप यांना बंदिस्त ठेवले होते. मोठ्या मध्यस्थीनंतरच त्यांची सुटका झाली, असेही ते म्हणाले.

या घटनेनंतर मनीष कश्यप आणि डॉक्टरांचे काही समर्थक पोलीस ठाण्यात पोहोचले. सध्या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत असून, पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT