Buldhana Crime Saam tv
देश विदेश

BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

BJP Leader Shot : बिहारमधील भागलपूरमध्ये भाजप नेते बबलू यादव यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. पाच जणांनी घरात घुसून हल्ला केला. आरोपी सूरज तांतीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

BJP leader Bablu Yadav firing news in Bhagalpur : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधील भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. भाजप नेते विवेकानंद प्रसाद उर्फ बबलू यादव यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पाच जण अचानक घरात घुसले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या. बरारी पोलीस स्टेशन हद्दीतील टीएनबी लॉ कॉलेज लेनमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. भागलपूरचे डीएसपी अजय कमार चौधरी यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली.

बिहारमधील भागलपूरमध्ये भाजप नेते विवेकानंद प्रसाद उर्फ ​​बबलू यादव यांच्यावर कुख्यात गुन्हेगार सूरज तांती यांनी गोळ्या झाडल्या. कुख्यात हल्लेखोर त्याच्या चार साथीदारांसह तिलकमांझी चौकाजवळील टीएनबी लॉ कॉलेज रोडवरील त्याच्या निवासस्थानी जाऊन गोळ्या झाडल्या.पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर ४ जणांचा शोध घेतला जात आहे. विधानसभा निवडणुका सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिकांनी याबाबत सांगितले की, भाजप नेते बबलू यादव आपल्या घराबाहेर फिरत होते. त्यावेळी आरोपी सूरज तांती यांनी धाडधाड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बबलू यादव गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी यादवला मायागंज रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे.

पोलिस काय म्हणाले ?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांकडून या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. डीएसपी चौधरी यांनी ही घटना जुन्या वादातून झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी स्थानिक फळ विक्रेते दिवानंद आणि सूरज तांती यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणादरम्यान बबलू यादवने पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनीएखाला ताब्यात घेतले होते. याच रागातून सूरज तांती यांनी हा हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nightclub Fire : गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

SCROLL FOR NEXT