BJP
BJP saam tv
देश विदेश

Gujrat Exit Polls: गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता? काँग्रेस-आपला किती जागा मिळणार?

साम टिव्ही ब्युरो

अहमदाबाद : गुजरातमध्ये दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात आज गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान झाले. अशा प्रकारे एकूण 182 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 63.31 टक्के मतदान झाले. गुजरातमध्ये सत्तास्थापनेसाठी 92 जागांची आवश्यकता आहे.

आज तक अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत

आज तक अॅक्सिसने आपल्या एक्झिट पोलमध्ये गुजरातमध्ये भाजपला पूर्ण बहुमत दिले आहे.या एक्झिट पोलनुसार भाजपला 129 ते 151 जागा मिळत आहेत. तर काँग्रेसला येथे 16 ते 30 जागा मिळू शकतात. तर नव्याने एन्ट्री घेतलेल्या आम आदमी पक्षाला राज्यात जोरदार झटका बसताना दिसत आहे. 'आप'ला येथे 9 ते 21 जागा मिळू शकतात. तर इतर उमेदवारांना 2 ते 5 जागा मिळताना दिसत आहेत.  (Latest Marathi News)

एबीपी सी व्होटर

एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 128 ते 140 जागा, काँग्रेसला 31 ते 43 जागा मिळत आहेत. त्याचवेळी, आम आदमी पक्ष येथे 3 ते 11 जागांवर मिळताना दिसत आहे. याशिवाय इतर उमेदवारांना 2 ते 6 जागा मिळताना दिसत आहेत.

झी न्यूज-BARCच्या एक्झिट पोल

झी न्यूज बीएआरसीच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. येथे भाजपला 110 ते 125 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला 45 ते 60 जागा मिळू शकतात. झी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला येथे एक ते पाच तर इतरांना शून्य ते चार जागा मिळत आहेत.

टाईम्स नाऊ ईटीजीने एक्झिट पोल

टाईम्स नाऊ ईटीजी एक्झिट पोलमध्ये भाजपला 139 आणि काँग्रेसला 30 जागा मिळाताना दिसून आले आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला 11 तर इतरांना दोन जागा मिळताना दिसत आहेत.

पी-मार्क एक्झिट पोलने भाजपला बहुमत

रिपब्लिक पी-मार्के यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये दावा केला आहे की गुजरातमध्ये भाजपला 128 ते 148 जागा आणि काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळू शकतात. त्याचवेळी आम आदमी पक्षाला येथे केवळ दोन ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना तीन जागा मिळू शकतात.

टीव्ही 9

TV9 ऑन द स्पॉटच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला जात आहे. भाजपला 128 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस 45 जागांवर जाऊ शकते. तर आम आदमी पक्षाला केवळ तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांच्या खात्यात पाच ते सात जागा येऊ शकतात.

हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीचा सामना

हिमाचल प्रदेशमध्ये विविध एक्झिट पोलमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. काही एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बाजी मारताना दिसत आहेत. तर काही एक्झिट पोलमध्ये भाजप वरचढ दिसत आहे. त्यामुळे येथे कोण सत्ता स्थापन करणार हे येत्या 8 तारखेला स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai Crime : ४८ लाख रुपयांची घरफोडी आली उघडकीस; तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात

Palghar Politics: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Rohit Pawar News | बारामतीत पैसे वाटले, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT