Arvind Kumar Chaudhary, Anil Yadav 
देश विदेश

माजी खासदार आणि सीबीआय अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. बसपाचे माजी खासदार अरविंद कुमार चौधरी आणि सीबीआयचे माजी उपअधीक्षक अनिल यादव यांनी लखनौमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

Namdeo Kumbhar

Arvind Kumar Chaudhary, Anil Yadav : विधानसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशमध्ये भाजपची ताकद आणखी वाढली आहे. बसपाचे माजी खासदार अरविंद चौधरी आणि सीबीआयचे माजी उपअधीक्षक (DSP) अनिल यादव यांनी आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत दोन्ही बड्या नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. (Former BSP MP Arvind Kumar Chaudhary joins BJP)

लखनौ येथील भाजप मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी दोन्ही नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व दिलं. बांदा येथे राहणारे माजी सीबीआय अधिकारी अनिल यादव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री धर्मपाल सिंह आणि दयाशंकर सिंह हेही उपस्थित होते.

अरविंद कुमार चौधरी यांना पक्षात सामील करून अयोध्या, देवीपाटन आणि गोरखपूर विभागांमधील कुर्मी येथील मतदारांना आकर्षिक करण्याची भाजपची रणनीती असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या या निर्णयामुळे सपाच्या कुर्मी मतदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पूर्वांचलमध्ये मोठ्या कुर्मी मतदारवर्गामुळे सपाची स्थिती मजबूत आहे. त्यांना शह देण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, भाजप बस्तीच्या कप्तनगंज विधानसभा मतदारसंघातून अरविंद कुमार चौधरी यांना तिकीट देऊ शकते. अरविंद चौधरी यांना भाजपला तिकिट दिल्यास समाजवादी पक्षाच्या अडचणी वाढू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये यादवांनंतर इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) कुर्मी मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अरविंद कुमार चौधरी बुधवारी सकाळी आपल्या समर्थकांच्या मोठ्या ताफ्यासह बस्तीहून लखनौला पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अरविंद चौधरी हे २००९ ते २०१४ पर्यंत बस्तीचे खासदार होते. ते बस्तीचे विद्यमान समाजवादी पक्षाचे खासदार राम प्रसाद चौधरी यांचे भाचे आहेत.

माजी सीबीआय अधिकारी अनिल यादव यांनी २०१५ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते सामाजिक कार्यात गुंतले. त्यानंतर त्यांनी आपले वडील बी. पी. यादव यांच्या नावाच्या एका फाउंडेशनमार्फत समाजकार्य केले. अनिल यादव यांचे वडील, बी. पी. यादव हे समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते. ऑक्टोबर २०२० मध्ये, तत्कालीन सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत अनिल यादव यांनी पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांनीही सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways : लाल-निळा अन् पिवळा; रंग बघून ओळखा ट्रेनचा कोणता डबा आहे?

Political News: भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra News Live Update: भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी साजरी केली भाऊबीज

दररोज १०,००० पावले चालणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

पाण्यात की दुधात, ड्रायफ्रुट्स कशामध्ये भिजून खावे?

SCROLL FOR NEXT