BJP leader Rameshwar Singh reportedly collapsed during a public event in Jharkhand and later died, sparking protests over alleged lack of medical care. Saam Tv
देश विदेश

तब्येत बिघडली, मंचावरून खाली पडले; रुग्णालयात उपचाराअभावी भाजपच्या महामंत्र्याचे निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

BJP General Secretary Dies After Falling From Stage: भाजपचे महामंत्री रामेश्वर सिंह यांची कार्यक्रमादरम्यान तब्येत बिघडून मंचावरून पडल्याने मृत्यू झाला.

Omkar Sonawane

आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एका भाजप नेत्याला आपला गुरुवारी (दि.5) जीव गमवावा लागला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध व्यक्त केला आहे. या नेत्याचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील एका कार्यक्रमामध्ये भाजपचे महामंत्री रामेश्वर सिंह यांची अचानक तब्येत बिघडली. यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ उपलब्ध नसल्याने महामंत्र्यांवर उपचार झाले नाही आणि त्यांनी आपला प्राण सोडला. यानंतर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि जोरदार निषेध व्यक्त करत जलडेगा शहरात बंद पुकारला.

BJP Leader Rameshwar Singh Dies After Health Collapse at Event in Jharkhand

दोषींवर कारवाईची मागणी

भाजप कार्यकर्त्यांनी आरोग्य व्यवस्थेत सुधारणा आणि दोषींवर कारवाईची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील सर्व दुकाने बंद केली असून जागोजागी निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते रामेश्वर सिंह यांचे एका कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत बिघडली, आणि ते मंचावरून खाली पडले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी एक ही डॉक्टर आणि एकही वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना उपचार मिळू शकला नाही. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांचा आरोप आहे की रामेश्वर सिंह यांची प्रकृती बिघडल्यानंतर आणि त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचा असाही आरोप आहे की त्यांच्यावर अजिबात उपचार केले गेले नाहीत, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काही कार्यकर्ते या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. परिस्थिती बिघडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, ज्यामुळे ही घटना घडली, असे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे झारखंडचे राजकारण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली; चहा पित बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू

LPG Gas Booking: गॅस सिलेंडर मिळत नाही? घरबसल्या करा या 4 सोप्या पद्धतीने करा झटपट बुकिंग

Maharashtra Live News Update : 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Good News: मुंबईवरून नवी मुंबईला जा सुसाट, ४० मिनिटांचा प्रवास फक्त १० मिनिटात; सरकारचा जबरदस्त प्लान

Ground Report : महायुद्धाची महाराष्ट्राला झळ; मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर... ४०० कंपन्या बंद होणार? जिल्हा जिल्ह्यात परिस्थिती काय?

SCROLL FOR NEXT