NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात झालेल्या Gen Z आंदोलनानंतर आता भाजपने युवा पिढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तरुणांमध्ये पक्षाची विचारधारा आणि विकासकामे पोहोचवणे आणि त्यांच्यात विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी भाजपने देशभरातील युवकांशी संवाद साधण्यासाठी एका नव्या टीमची स्थापना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या टीममध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय महासचिव स्मृती इराणी, विनोद तावडे, हर्ष सांघवी, ओपी चौधरी यांच्यासह इतर काही सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ही रणनीती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भाजप या नव्या टीमच्या माध्यमातून Gen Z मधील तरुणांसाठी ‘Gen Z Outreach Programme’ राबवणार असल्याची माहिती आहे. या टीमचे सदस्य पुढील महिन्यापासून देशभरातील युवकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. नव्या पिढीशी अधिक चांगला संवाद आणि संबंध निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
शनिवारी पक्षातील एका वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय महासचिव स्मृती इराणी आणि विनोद तावडे, गुजरातचे मंत्री हर्ष सांघवी, छत्तीसगडचे मंत्री ओपी चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजप लवकरच Gen Z सोबत हा आउटरीच कार्यक्रम सुरू करणार आहे. युवा पिढीशी अधिक थेट आणि सातत्यपूर्ण संवाद प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या कार्यक्रमादरम्यान Gen Z च्या आकांक्षा, प्रश्न आणि अपेक्षा समजून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासोबतच युवकांना भाजप नेत्यांशी थेट जोडले जाण्याची आणि त्यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली मते मांडण्याची संधीही या कार्यक्रमातून मिळणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून भाजप युवा मतदारांशी आपले नाते अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. विविध उपक्रम आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.
या टीममध्ये संघटनात्मक अनुभव असलेल्या नेत्यांसोबत युवा नेतृत्वाचाही समावेश करण्यात आल्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप अनुभवी नेते आणि तरुणांचा थेट संपर्क करून देत असल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाचे वेळापत्रक, आणि ठिकाणी यांची माहिती लवकरच केली जाणार आहे. दरम्यान, पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलानंतर शनिवारी नव्या राष्ट्रीय टीमची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत आगामी निवडणुकांची रणनीती आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या या बैठकीपूर्वी राष्ट्रगीत वंदे मातरम गाण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.