RAVINDRA PRASAD SINGH DEATH NEWS | saam tv
देश विदेश

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Former BJP District President Ravindra Prasad Singh Passes Away: बिहार भाजपचे मुजफ्फरपूरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र प्रसाद सिंह यांचे निधन झाले आहे.

Omkar Sonawane

भारतीय जनता पक्षाचे मुजफ्फरपूरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि बिहार प्रदेशचे माजी उपाध्यक्ष रवींद्र प्रसाद सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने पक्षासह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजप नेते मनीष कुमार यांनी रवींद्र प्रसाद सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहेत. सिंह यांचे निधन हे भाजप परिवारासह समाजासाठी मोठे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले.

मनीष कुमार म्हणाले की, रवींद्र प्रसाद सिंह हे पक्षासाठी खूप महत्वाचे संघटक होते. संघटनात्मक कामांसोबतच ते सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय सहभाग घेत असत. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच ते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. त्यांच्या निधनाने आपल्याला वैयक्तिक स्तरावरही मोठा धक्का बसल्याचे मनीष कुमार यांनी सांगितले.

संघटनात्मक आणि सामाजिक कार्यांत महत्त्वाचे योगदान

रवींद्र प्रसाद सिंह यांचे अकाली निधन अत्यंत दुःखद असल्याचे मनीष कुमार यांनी नमूद केले. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक अनुभवी संघटक गमावला आहे. पक्ष आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण दीर्घकाळ ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप नेते मनीष कुमार यांनी दिवंगत रवींद्र प्रसाद सिंह यांच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच या कठीण प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

Sleeping : गाढ अन् शांत झोप लागत नाही?आजपासूनच टाळा रात्रीच्या 'या' ५ सवयी

14 Days Without Sugar: 14 दिवस साखर खाणं बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT