BJP Political Leader Saam
देश विदेश

भाजप नेत्याची गळा चिरून हत्या; बेडवर रक्ताने माखलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

BJP Political Leader: भाजपचे माजी ब्लॉक प्रमुख विनोद चौधरी यांची राहत्या घरात हत्या झाली. कुटुंबीयांच्या आरोपानुसार जुने वैमनस्य किंवा राजकीय कारणांमुळे हत्या झाली असल्याचा संशय.

Bhagyashree Kamble

  • बुलंदशहरमध्ये भाजपचे माजी ब्लॉक प्रमुख विनोद चौधरी यांची निर्घृण हत्या.

  • जुन्या वैमनस्यातून किंवा राजकीय कारणातून हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

  • पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तपासात काही पुरावे हाती.

  • आगामी तपासातून खून प्रकरणाचा लवकर उलगडा होण्याची शक्यता.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपचे माजी ब्लॉक प्रमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नेत्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. जुन्या वैमनस्यातून किंवा राजकारणातून त्यांची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

विनोद चौधरी असे मृत भाजपचे माजी ब्लॉक प्रमुखाचे नाव आहे. ते खुर्जा कोतवाली नगर परिसरातील हमीदपूर कला येथील रहिवासी होते. विनोद चौधरी हे जेवर आणि खुर्जाचे माजी ब्लॉक प्रमुख होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात मृतदेह आढळला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

विनोद चौधरीचे भाऊ म्हणाले की, 'माझा भाऊ कामानिमित्त ४ ते ५ जणांसोबत गेला होता. सायंकाळी माझा भाऊ परतलाच नाही. त्याचं कुणासोबत तरी पैशांवरून वाद सुरू होता. त्या व्यक्तीनं विनोदला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात गेलो होतो', अशी माहिती त्यांनी दिली.

विनोद चौधरी नक्की कोण होते?

विनोद चौधरी हे २००० ते २००५ पर्यंत जेवर परिसरातील ब्लॉक प्रमुख होते. नंतर ते जिल्हा पंचायत सदस्य होते. यानंतर ते पुन्हा खुर्जाचे ब्लॉक प्रमुख होते. विनोद चौधरी हे बराच काळ भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते. त्यांची हत्या जु्न्या वैमनस्यातून किंवा राजकारणातून झाली असल्याचा आरोप कुटुबियांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT