Kushagra Sagar Resigns Saam TV
देश विदेश

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

Kushagra Sagar resignation news : उत्तर प्रदेशातील बदायूं येथील भाजपचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी ११ वर्षांच्या पक्षातील प्रवासानंतर राजीनामा दिला आहे. पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केली.

Namdeo Kumbhar

Kushagra Sagar Resigns : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. माजी खासदार धर्मेन्द्र कश्यप यांच्यानंतर आता बदायूं येथील भाजपचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील ११ वर्षांपासून पक्षात प्रामाणिकपणे काम करूनही योग्य तो मान मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. कुशाग्र सागर यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कुशाग्र सागर यांनी राजीनामा दिल्यानतर सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. मिळालेल्या माहितीनुसार कुशाग्र सागर हे लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुशाग्र सागर यांनी पोस्टमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मी या संस्थेला कुटुंब मानून ११ वर्षे सेवा केली. कोणत्याही संस्थेशी ११ वर्षे जोडले जाणे हे फक्त राजकीय संलग्नता नाही तर एक भावनिक बंधन आहे. या संस्थेला कुटुंब मानले, १००% योगदान दिले, वैयक्तिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही सर्वतोपरी प्रयत्न केले. ही वेदना पद किंवा प्रतिष्ठेची नाही, तर तुटलेल्या आदराची आणि विश्वासाची आहे. ११ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतरही मला आपलेपणाची भावना मिळाली नाही. त्यामुळे माझ्या हृदयाला वेदना झाल्या. हा शेवट नाही, तर आत्मसन्मानाची एक नवी सुरुवात आहे.

आमदार आशुतोष मौर्य यांना भाजपने सध्या प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कुशाग्र सागर बऱ्याच काळापासून नाराज होते. आशुतोष मौर्य हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत, परंतु राज्यसभा निवडणुकीत पक्षांतर केल्यामुळे ते भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्या पत्नी सुषमा मौर्य (बिल्सी नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा) आणि बहीण भाजपमध्ये सामील झाल्या. याकडे २०२७ च्या निवडणुकीचे तिकीट मिळण्याचे संकेत म्हणून पाहिले गेले. त्यामुळे कुशाग्र गटात असंतोष वाढू लागला.

कुशाग्र सागर हे बदायूं येथील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील योगेंद्र कुमार हेही आमदार होते. कुशाग्र यांनी २०१७ मधील निवडणूक भाजपच्या तिकिटावर १०,६८८ मतांनी जिंकली होती. त्यांना १,००,२८७ मते मिळाली होती. २०२२ मध्ये ते पुन्हा आमनेसामने आले, पण यावेळी त्यांचा केवळ १,८३४ मतांच्या निसटत्या फरकाने पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT