cCabinet Reshuffle Saam Tv
देश विदेश

२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

Cabinet Reshuffle : भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी दोन विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होऊन चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

Modi cabinet reshuffle latest news : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या ८ जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. पण यात विद्यमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा या दोन दिग्गज मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्यात आले. भाजपच्या या अनपेक्षित निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

कायदेशीर अडचण आणि मंत्रिपदाचे गणित

भारतीय संविधानातील कलम ७५(५) च्या नियमानुसार, कोणत्याही मंत्र्याला पदावर राहण्यासाठी संसदेच्या (लोकसभा किंवा राज्यसभा) दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य असणे अनिवार्य असते. जर एखादा मंत्री सलग ६ महिने खासदार नसेल, तर त्याला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. हरदीपसिंग पुरी आणि बी. एल. वर्मा या दोघांचाही राज्यसभेतील कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. पक्षाने त्यांना पुन्हा उच्च सभागृहात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

४ नव्या मंत्र्यांची होणार सरप्राईज एंट्री?

आता मोदी सरकारमध्ये ४ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये पूर्वीच राजीनामा दिलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांच्यासह आता हरदीपसिंग पुरी व बी. एल. वर्मा यांच्या जागी नवीन नेत्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत. रवनीत सिंग बिट्टू यांना आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव

भाजपने यंदा उत्तर प्रदेशातून ८ जागांवर नवीन उमेदवारांना संधी देत जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यात दोन महिला, दोन ब्राह्मण, तीन इतर मागासवर्गीय (OBC) आणि एका ठाकूर नेत्याचा समावेश आहे. पक्षाने जुन्या सर्व ८ खासदारांना बाजूला सारत नव्या नेतृत्वाला वाव देण्याचे धोरण अवलंबले आहे. पण मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याला संधी मिळणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

SCROLL FOR NEXT