JP Nadda Wife Car Stolen Saam Tv
देश विदेश

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरी, पोलीस घेतायत शोध

Mallika Nadda News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

JP Nadda Wife Car Stolen:

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार त्यांचा ड्रायव्हर सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेला होता. यानंतर 19 मार्च रोजी त्यांची कार सर्व्हिस सेंटरमधूनच चोरीला गेली.

ड्रायव्हरच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी आता कारचा शोध सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणी जवळपासचे सीसीटीव्ही पाहत आहेत. तसेच संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीत ड्रायव्हरने म्हटले आहे की, कारचा नोंदणी क्रमांक HP03D0021 आहे. ही कार अरोरा प्रॉपर्टीज आरडी मार्गासमोरील गोविंदपुरी येथून चोरी झाली आहे. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान कार चोरीला गेल्याची शक्यता असल्याचे ड्रायव्हरने सांगितले आहे.  (Crime News in Marathi)

दरम्यान, दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरीला जाते. अशातच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोण आहे मल्लिका नड्डा?

डॉ. मल्लिका नड्डा या स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या अध्यक्षा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या 30 वर्षांहून अधिक काळापासून महिला सशक्तीकरणाशी संबंधित काम करत आहेत. मल्लिका नड्डा यांनी इतिहासात डॉक्टरेट केले आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. त्यांचे वडील त्यांच्या काळातील मोठे सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व होते. त्यांची आई जयश्री बॅनर्जी मध्य प्रदेशच्या माजी खासदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

Black Salt vs Regular Salt : काळं मीठ की साधं मीठ? हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कोणते मीठ खावे?

Maharashtra News Live Update: राज्यात दुष्काळाने शेतकरी बेहाल, मंत्रालयात कोट्यावधींची उधळपट्टी

Deep Depression Storm : बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशनची' तीव्रता वाढली, 'या' राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

Navel oil therapy: २१ दिवस बेंबीत तेल लावल्यास काय होईल? जाणून घ्या मोहरी, नारळ, बदाम तेलाचे फायदे

SCROLL FOR NEXT