Maharashtra senior leader given responsibility for Kerala BJP campaign Saam tv
देश विदेश

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Kerala assembly election news : विनोद तावडे हे यापूर्वी बिहारमध्ये प्रभारी होते. आता त्यांच्यावर केरळची जबाबदारी देण्यात आली आहे.

Bharat Jadhav

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होत नाही तोच भाजप कामाला लागली आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी बड्या नेत्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. येथे विजयाची पतका फडकावण्यासाठी भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी त्यांना भाजपनं प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद तावडे यांच्या खांद्यावर केरळमध्ये पहिला विजय मिळविण्याचे आव्हान असणार आहे. केरळमध्ये भाजपला एकदाही विधानसभेत बहुमत मिळालेले नाहीये.

केरळमध्ये सध्या भाजपचा एकही आमदार नसल्याने तावडे यांना थेट शुन्यापासून सुरूवात करावी लागणार आहे. तावडे यांच्यासाठी हे शिवधनुष्य ठरणार आहे. केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच तावडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत कार्यकर्त्यांना भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले आहे.

इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'विकसित भारत विकसित केरळम' हा संदेश प्रत्येक घरात पोहोचविण्याचे तसेच विकास आणि समावेशक प्रशासनाच्या चळवळीला बळकटी देण्याचे आवाहन तावडे यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

याआधी विनोद तावडे यांना बिहारमध्ये प्रभारी करण्यात आले होते, तेथे भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळेच त्यांच्यावर आता केरळ राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तेथील प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शुन्यापासून ते किती जागां निवडून आणतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अकोल्यात टॉवर चौकात वंचित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT