BJP News  Saam tv
देश विदेश

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

BJP Latest News : तामिळनाडू विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी समोर आली आहे. या यादीत अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

Vishal Gangurde

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दंड थोपटले

भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर

राज ठाकरेंना आव्हान देणारे अण्णामलाई यांना तिकीट नाही

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने शुक्रवारी २७ जागांसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. यात माजी राज्यपाल यांच्यासहित अनेक मातब्बर नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु यात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज ठाकरेंना आव्हान देणारे अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे अण्णामलाई यांचे तिकीट कापल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश नाही. मागील विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूत पक्षातील संघटनेची मोर्चेबांधणी करणारे अण्णामलाई यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की, अण्णामलाई यांना रणनीती, प्रचाराची जबाबदारी देण्यात येऊ शकते. भाजपने एआयएडीएमके पक्षामुळे अण्णामलाई यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत केंद्रीय मंत्री एल मुरूगन यांच्यापासून माजी राज्यपाल सुंदरराजन यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने एल मुरुगन यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. तर तेलंगणाचे माजी राज्यपाल तिमिलिसाई सुंदरराजन यांना मायलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. कोयंबटूर (उत्तर) जागेवर वी श्रीनिवासन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने सत्तूर येथून नैनार नागेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिरुपूर (दक्षिण) येथून एस थंगराज यांना तिकीट मिळालं आहे. तत्पूर्वी, तामिळनाडूत विधानसभेच्या एकूण २३४ जागा आहेत. या सर्व जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूत भाजपने एआयएडीएमके पक्षाशी युती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT