Biporjoy Cyclone at Pakistan Saam TV
देश विदेश

Biparjoy Cyclone at Pakistan: पाकिस्तानात बिपरजॉय चक्रीवादळाचे थैमान; 34 जणांचा मृत्यू, 145 जखमी

Biporjoy Cyclone Update: तसेच 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.

Ruchika Jadhav

Pakistan Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाने पाकिस्तानात थैमान घातलं आहे. येथे अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. वादळाने रौद्र रुप धारण केल्याने आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. ( Pakistan Cyclone Latest News)

दरम्यान, IMD वर आलेल्या वृत्तानुसार, बिपरजॉय चक्रीवादळाने (Biporjoy Cyclone) तीव्र रुप धारण केलं आहे. यात बिपरजॉय अक्षांश 17.4N आणि लांब 67.3E, मुंबईपासून सुमारे 600 किमी अंतरावर आहे. तर पोरबंदरच्या 530 किमी अंतरावर हे चक्रीवादळ आहे. तसेच कराचीपासून 830 किमी अंतरावर केंद्रीत होत आहे. 15 जून रोजी वादळ दुपारच्या सुमारास पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीजवळ पोहचणार आहे.

प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पाकिस्तानच्या (Pakistan) बन्नू, दिखान, लक्की मारवत आणि करक या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचं दिसत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले. यासह काही घरांच्या भींती देखील कोसळल्या. तसेच रस्त्यावर जागोजागी झाडे उनमळून पडली आहेत.

जखमींची संख्या सध्या 145 आहे. मात्र हा आकडा 15 जूनपर्यंत आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या दुर्घटनेत पुनर्वसन आणि मदत कार्यांसाठी 40 दशलक्ष रुपये जारी केले आहेत. वादळाच्या तीव्रतेने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT