Work-Life Balance  saam tv
देश विदेश

Bill Gates: आता 5 दिवस सुट्टी, 2 दिवस काम? बिल गेट्सची भविष्यवाणी नोकरदारांसाठी आंनदाची बातमी की धोक्याची घंटा ?

5 Days Off, 2 Days Work: नोकरदारांना आता आठवड्याचे 5 दिवस सुट्टी आणि 2 दिवस काम करावं लागणार आहे. हे आम्ही म्हणत नाही.. तर धनाढ्य उद्योगपती म्हणतायत. तो धनाढ्य उद्योगपती कोण आहे? त्याचं म्हणणं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे भविष्यात अनेकांना नोकऱी गमवावी लागणार, असा दावा वारंवार केला जातो. त्यातच आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांनी एक भविष्यवाणी केलीय. त्याच्या भविष्यवाणीनुसार, नोकरदारांना फक्त 2 दिवस काम करावं लागणार आहे. मात्र ही आंनदवार्ता नसून धोक्याची घंटा आहे. बिल गेट्स यांनी काय म्हटलंय पाहूयात..

आंनदवार्ता की धोक्याची घंटा ?

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्यावर गदा

एआयमुळे सध्या आठवड्यातून फक्त तीन दिवस काम

येत्या 10 वर्षात एआयमुळे फक्त दोन दिवस काम

एकीकडे भारतातील उद्योजक तरुणांना 70 तास काम करण्यांचं आवाहन करतात. तर दुसरीकडे जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स भविष्यात लोकांना फक्त दोन दिवस काम करावे लागेल, अशी भविष्यवाणी करतायत. मात्र एआयच्या प्रगतीमुळे उत्पादन, लॉजिस्टिक्स, औषध आणि अध्यापन यासारख्या क्षेत्रात मानवाचा सहभाग कमी होईल. ज्यामुळे त्या क्षेत्रातील लोकांच्या कामाचा ताण कमी होऊन जीवन आणि काम यांच्यातील संतुलन सुधारेल.

मुळात एआयमुळे अनेक क्षेत्राला धोका पोहचणार असं वारंवार बोलल जातं. मात्र कृत्रिम बुद्धीमत्तेचं हे तंत्रज्ञान आपण नीट समजून घेतलं आणि शिकण्याची वृत्ती ठेवली तर नोकरीच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT