Bilaspur Airport Flight tyre burst. ANI
देश विदेश

Shocking : लँडिंगवेळी विमानाचा टायर फुटला; दिल्लीहून भरलं होतं उड्डाण, विमानतळावर खळबळ

Bilaspur airport flight incident as aircraft tyre bursts during landing : दिल्ली -बिलासपूर विमानाचा टायर लँडिंगवेळी फुटला. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. या विमानात ३७ प्रवासी होते.

Nandkumar Joshi

Bilaspur airport : छत्तीसगडच्या बिलासपूर विमानतळावर मोठा अनर्थ टळला. बिलासपूर एअरपोर्टवर विमान उतरत असताना अचानक त्याचा टायर फुटला. या दुर्घटनेतून प्रवासी आणि क्रू मेंबर बालंबाल बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-बिलासपूर अलायन्स एअरचे एक विमान छत्तीसगडच्या बिलासपूर विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी अचानक विमानाचा टायर फुटला. या विमानात ३७ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. टायर फुटताच विमानातील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.

बिलासपूर विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना धावपट्टीवरून सुरक्षित बाहेर आणण्यात आले आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्ये नेण्यात आले.

विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. हे विमान एअरपोर्टवर उतरत असताना त्याचा टायर फुटला. अलायन्स एअरच्या या विमानात एकूण ४१ जण होते. त्यात ३७ प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. लँडिंगच्या वेळी विमानाच्या डाव्या बाजूचा टायर फुटला.

विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबरना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि धावपट्टीवरून टर्मिनल बिल्डिंगमध्ये आणले गेले, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित विमान कंपनीने विमानाचे पुढील उड्डाण रद्द केले, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वीही अशीच एक घटना बिहारच्या दरभंगा येथे घडली होती. दरभंगा विमानतळावर मुंबईहून उड्डाण भरलेल्या विमानाचा टायर अचानक फुटला होता. लँडिंगवेळीच ही दुर्घटना घडली होती. त्यावेळी विमानात १४८ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : मायक्रोवेव्ह की ओव्हन, जेवण कशामध्ये शिजवता? आरोग्यासाठी काय योग्य? जाणून घ्या

दिवाळीआधी 'गुड न्यूज'! दारूपासून कीवी आणि सफरचंद होणार स्वस्त; एका कराराने भारताला मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

Walk According to Age: २० ते ६० वयानुसार रोज किती चालावं? जाणून घ्या आरोग्यासाठी योग्य चालण्याचं प्रमाण

SCROLL FOR NEXT