Police Saam Tv
देश विदेश

ह्रदयद्रावक..! बिहारमध्ये पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

साम वृत्तसंथा

पटना: बिहारमधील (Bihar) समस्तीपूर जिल्ह्यात एका कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना विद्यापतीनगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील मऊ धनेशपूर दक्षिण गावमध्ये घडली आहे. पती, पत्नीसह आई, आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे.

रविवारी सकाळी या कुटुंबातील कोणीच घराबाहेर आले नाही, म्हणून शेजारच्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, ५ जणांचा मृतदेह मिळाला. पाचही जणांनी गळफास घेतला होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, माहिती मिळताच डीएसपी दिनेशकुमार पांडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज झा (४२ वर्षे), त्यांची पत्नी सुंदरमणी देवी (३८ वर्षे), आई सीता देवी (६५ वर्षे), मुले सत्यम (१० वर्षे) आणि शिवम (७ वर्षे) हे मढ येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये राहत होते. धनेशपूर दक्षिण गावात या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातील भर लोकवस्तीत शिरली मगर

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT