Bihar Siwan firecracker blast latest news saam tv
देश विदेश

फटाके बनवत असताना भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, अख्खं गाव हादरलं

Bihar Siwan Firecracker Blast Latest News: बिहारच्या सिवान जिल्ह्यातील आलमपूर गावात फटाके बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.

Omkar Sonawane

बिहारच्या सिवान जिल्ह्यातील आलमपूर या गावात संध्याकाळी फटाके बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सुमारे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने अद्याप मृतांचा आकडा स्पष्ट केलेला नाही.

मिळालेल्या महितीनुसार, फटाकेचे व्यापारी अमीरुद्दीन यांच्या घरात नेहमीप्रमाणे फटाके बनवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक आग लागली आणि फटाक्यांचा स्फोट होऊ लागला. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. स्फोट इतका भयानक होता की घराचे मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत फटाके व्यावसायिक अमीरुद्दीन, त्यांच्या तीन नाती, एक नातू आणि दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. मात्र, सिवानचे जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन ते तीन मृतदेहच बाहेर काढण्यात आले आहेत. इतर व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या असण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून घटनास्थळी शोधमोहीम सुरू असून, संपूर्ण तपासणीनंतरच मृतांचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले आहे. हे सुरुवातीला कोणालाही समजत नव्हते, त्यानंतर अमीरुद्दीन यांच्या घरात स्फोट झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ९ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी, विभागीय आयुक्तांनी थेट आदेश काढला, कारण काय?

Saam Music : संगीताच्या विश्वात नव्या सुरांची साद; 'साम म्युझिक' युट्यूब चॅनेलची दिमाखदार सुरुवात

पुणे, विदर्भ अन् मराठवाड्यात कुणाचा आमदार? Exit पोलचा धक्कादायक अंदाज, शिक्षक-पदवीधर मतदारसंघात गुलाल कोण उधळणार?

BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

3 बड्या अधिकाऱ्यांचे निलबंन; एकनाथ शिंदेंचे निर्देश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT