Bihar CM Samrat Choudhary with cabinet members after portfolio allocation announcement. saam tv
देश विदेश

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

Bihar Cabinet Expansion: बिहारमध्ये खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी २९ विभाग सांभाळतील. याशिवाय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Bharat Jadhav

  • सम्राट चौधरी यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

  • विजय चौधरी यांना १० आणि विजेंद्र प्रसाद यादव यांना ८ विभाग देण्यात आले आहेत.

  • बिहार सरकारने अधिकृत अधिसूचनेद्वारे माहिती जाहीर

राज्याची सत्ता स्रमाट चौधरींच्या हाती आल्यानंतर लागलीच बिहारमधील सत्ताकारण बदलण्यास सुरुवात झाली आहे. सम्राट चौधरी हे बिहारचे २४ वे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी १५ एप्रिल रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमधील सरकारच्या मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेत. यात धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे २९ विभाग सांभाळणार आहेत. तर उपमुख्यमंत्री विजय चौधरी १०, तर विजेंद्र प्रसाद यादव आठ विभागांची जबाबदारी सांभाळतील. ही माहिती बिहार सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे.

सम्राट चौधरी यांनी आपल्याकडे २९ विभाग कायम ठेवले आहेत. यामध्ये गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य, कॅबिनेट सचिवालय विभाग, निवडणूक विभाग, कृषी आणि रस्ते बांधकाम व देखरेख विभागाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क, जलसंपदा, संसदीय कामकाज आणि बांधकाम यासह १० खाती आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री, विजेंद्र यादव यांच्याकडे ऊर्जा, नियोजन आणि विकास यासह आठ खाती आहेत.

मुख्यमंत्र्यांकडील खाती

सामान्य प्रशासन

२ गृह

३ कॅबिनेट सचिवालय

४ दक्षता

५ निवडणुका

६ महसूल आणि भू-सुधारणा

७ खाणी आणि भूविज्ञान

८ शहरी विकास आणि गृहनिर्माण

९ आरोग्य

१० कायदा

११ उद्योग

१२ रस्ते बांधकाम

१३ कृषी

१४ गौण जलस्रोत

१५ कामगार

१६ युवक, रोजगार आणि कौशल्य विकास

१७ पर्यटन

१८ कला आणि संस्कृती

१९ दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन

२० आपत्ती व्यवस्थापन

२१ मागास वर्ग आणि अतिमागास वर्गाचे कल्याण

२२ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे कल्याण

२३ माहिती तंत्रज्ञान

२४ क्रीडा

२५ सहकारी संस्था

२६ पर्यावरण, वन आणि हवामान बदल

२७ ऊस उद्योग

२८ सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी

२९ पंचायती राज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभा-राज्यसभेत चर्चा सुरु

Kangana Ranaut: 'जेनरेशन गटार', 'ड्रग्ज, दारू आणि शारीरिक संबंध...'; तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

Guru Purnima 2026 Rajyog : गुरु पौर्णिमेला ६० वर्षांनंतर जुळून आला राजयोग; या ४ राशींचं नशीब चमकणार, पैसाच पैसा मिळणार

Satara Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणा

SCROLL FOR NEXT