Politics x
देश विदेश

Politics : इंडिया आघाडीला दुहेरी धक्का, २ बड्या नेत्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

Political News : बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी इंडिया आघाडीला दुहेरी धक्का बसला आहे. आघाडीतील दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे.

Yash Shirke

  • बिहार विधानसभा निवडणुकांआधी इंडिया आघाडीला धक्के

  • इंडिया आघाडीतील दोन बड्या नेत्यांनी दिला राजीनामा

  • भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची शक्यता

Bihar Politics : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर २०२५ मध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वा बिहारमध्ये इंडिया आघाडीला दुहेरी धक्का बसला आहे. आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) या दोन मित्रपक्षातील प्रत्येकी दोन आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हे दोन्ही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

महाआघाडी सरकारमधील माजी मंत्री मुरारी प्रसाद गौतम यांनी सभापती नंद किशोर यादव यांच्याकडे राजीनामा सादर केला. गौतम यांच्यावर यापूर्वी जनता दल (संयुक्त) (जेडीयू) सोबत संगनमत केल्याचा आरोप होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. सभापतींनी निर्णय देण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. मुरारी प्रसाद गौतम हे दिवंगत माजी मुख्यमंत्री महेंद्र राम यांचे पुत्र आहेत. ते प्रभावशाली स्थानिक नेते आहेत.

मुरारी प्रसाद यांच्या राजीनाम्यानंतर राजद आमदार भरत बिंद यांनीही राजीनामा दिला. २०२० मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोन नेत्यांनी लागोपाठ राजीनामा दिल्याने इंडिया आघाडीला दुहेरी धक्के बसल्याचे म्हटले जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये पार पाडल्या जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान ६ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे ११ नोव्हेंबर रोजी पार पाडले जाईल. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT