महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत चालली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये एका पोलिस निरीक्षकाचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. एका प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी पोलिसाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली. तसेच तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवाकोठी पोलिस ठाण्याचे एडिशनल एसएचओ अरविंद शुक्ला यांच्यावर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. पीडित मुलीला एका प्रकरणात पोलिसांची मदत हवी होती. अरविंद शुक्ला यांनी मदत करणार असल्याचं सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री तिला त्यांच्या भाड्याच्या खोलीत बोलावून घेतलं. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. पीडितेने कुटुंबाला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ पोलिस ठाण्यात पोहोचले.
पीडित मुलीच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच डीएसपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी निरीक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.