Bihar Stampade News Saam TV
देश विदेश

Bihar Stampade News : बिहारमध्ये देवीच्या दर्शनावेळी चेंगराचेंगरी; लहान मुलासह ३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Bihar Stampade News : गोपालगंज शहरातील साखर मिल रोडवर असलेल्या राजा दलजवळ ही घटना घडली.

प्रविण वाकचौरे

Bihar News :

बिहारमध्ये दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत एका ५ वर्षांच्या लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.

गोपालगंज शहरातील साखर मिल रोडवर असलेल्या राजा दलजवळ ही घटना घडली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवरजिल्हा प्रशासनाने दुर्गादेवीचे दर्शन बंद केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, आकर्षक पूजा मंडप पाहण्यासाठी शुगर मिल रोडवर मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर अचानक गर्दीत चेंगराचेंगरी झाली. या लहान मुलासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या. मात्र काही वेळातचं त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी तेथे पोलिस बंदोबस्त नव्हता. संध्याकाळी महानवमीमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली. काही वेळातच ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अल्पवयीन मुलाचा जमिनीवर पडून मृत्यू झाला.

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने दुर्गापूजा मंडपात देवीच्या दर्शनावर बंदी घातली. याशिवाय परिसरातील वाहतुकीतही बदल केले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT