Bihar Bridge Collapsed Saam Tv
देश विदेश

Bihar Bridge Collapsed: बिहारमध्ये पूल कोसळला, आठवडाभरातील दुसरी घटना; VIDEO होतोय व्हायरल

Bihar Bridge Collapsed Video: बिहारच्या सिवान जिल्ह्यातील महाराजगंज ब्लॉकमधील पाटेधा गावात पूल कोसळल्याची घटना समोर आली. हा पूल कोसळल्यामुळे १२ पेक्षा अधिकर गावांचा संपर्क तुटला आहे.

Priya More

बिहारमध्ये पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये एकापाठोपाठ एक पूल पडल्याच्या घटना समोर येत आहेत. अररियानंतर बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला. सिवान जिल्ह्यातील महाराजगंज ब्लॉकमधील पाटेधा गावात पूल कोसळल्याची घटना समोर आली. दरोंदा विधानसभा सीमेला जोडणारा पूल अचानक कोसळला. हा पूल कोसळल्यामुळे १२ पेक्षा अधिकर गावांचा संपर्क तुटला आहे. या पूल कोसळण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल महाराजगंज क्षेत्रच्या पटेढी-गरौलीला जोडण्यात आला होता. कालव्यावर ३० वर्षांपूर्वी हा बांधण्यात आला होता. स्थानिग नागरिकांनी देणगी देऊन हा पूल बांधला होता. कालव्याची साफसफाई केल्यानंतर हा पूल कोसळला. हा पूल कोसळण्याचे कारण मातीची धूप असल्याचे सांगितले जात आहे. याआधी बिहारच्या अररियामध्ये पूल कोसळल्याची घटना घडली होती. आठवडाभरता ही पूल कोसळल्याची दुसरी घटना घडली आहे.

जिल्हा दंडाधिकारी मुलुल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, दारुंडा आणि महाराजगंज ब्लॉकमधील गावांना जोडणाऱ्या कालव्यावर हा पूल बांधण्यात आला होता. पहाटे पाचच्या सुमारास हा पूल कोसळला. या घटनेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा पूल ३० वर्षे जुना होता. हा पूल कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुटला आहे.

दरम्यान, बिहारच्या अररियामध्ये नव्याने बांधलेला बाकरा पूल काही दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित झाले होते. विरोधकांनी नितीश सरकारवर हल्लाबोल केला होता. अररिया पूल कोसळल्याप्रकरणी अनेक अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. याशिवाय कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले. राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT