Tejashwi Yadav Car Accident Saam TV
देश विदेश

Accident News: तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, ६ पोलीस जखमी

Bihar Accident News: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका कारला सोमवारी (२६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला.

Satish Daud

Tejashwi Yadav Car Accident News

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका कारला सोमवारी (२६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कार अनियंत्रित होऊन ताफ्यातील कारला धडकली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ६ पोलिसांसह अन्य ४ जण जखमी झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. मोहम्मद हलीम असं मृत कारचालकाचं नाव असून ते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका कारचे चालक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव सध्या जनविश्वास यात्रेवर आहेत. सोमवारी त्यांचा ताफा पूर्णिया जिल्ह्यातून बेलौरी येथून जात होता. या ताफ्यात एका स्काऊट वाहनाचाही समावेश होता. दरम्यान, पूर्णिया कटिहार चार लेन महामार्गावर कार चुकीच्या बाजूने गेली. (Latest Marathi News)

त्यामुळे कटिहारकडून येणाऱ्या लाल रंगाच्या एका कारने स्काऊट वाहनाला समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत स्काऊट कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.

याशिवाय ६ पोलिसांसह दुसऱ्या कारमधील ४ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पूर्णिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपेंद्रनाथ वर्मा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

SCROLL FOR NEXT