Bihar Crime News Saamtv
देश विदेश

Bihar Crime News: थरारक! आधी पतीला झाडाला बांधले अन् रॉकेल टाकून पेटवले; पत्नीच्या क्रूर कृत्याने खळबळ

आगीत होरपळून निघालेल्या शंभूकुमारला लोकांनी वाचवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Gangappa Pujari

Bihar Crime News: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक समोर आले आहे. ज्यामध्ये पत्नीने पतीला झाडाला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तिला तिचा नवरा आवडत नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे क्रूर कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडवून आणण्यासाठी पत्नीने आधी पतीला आपल्या जाळ्यात अडकवले, नंतर त्याला झाडाला बांधले, त्यानंतर रॉकेल टाकून पेटवून दिले. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, देवसर येथील २६ वर्षीय शंभू कुमारचा विवाह गेल्या वर्षी ७ जून रोजी गिजस (Bihar) गावातील २२ वर्षीय छोटी कुमारीसोबत झाला होता. शंभूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, की त्यांच्या सुनेला तिचा नवरा आवडत नव्हता आणि लग्नापासूनच ती भांडत होती. तिला शंभू आवडत नसल्यामुळे ते पती-पत्नी म्हणून कधीच राहिले नाहीत.

दुसरीकडे, मुलीचे कुटुंबीय तिच्यावर शंभूसोबत राहण्यासाठी वारंवार दबाव आणत होते, त्यामुळे तिने शंभूला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. ती काही दिवसांपूर्वी माहेरी घरी आली होती, ज्यानंतर तिने पतीचा काटा काढण्यासाठी एक भयंकर कट रचला.(Latest Marathi News)

उपचार घेत असलेल्या शंभूने सांगितले की, शनिवारी रात्री पत्नीने घरामागील बागेत नेले. तेथे झाडाला दोरी व भांडे बांधून त्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले. आग पेटू लागल्यावर झाडाला बांधलेला शंभूकुमार जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले.

आगीत होरपळून निघालेल्या झाडाला बांधलेल्या शंभूकुमारला त्यांनी वाचवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शंभूला वाचवताना दोन जण गंभीर भाजले. स्थानिक लोकांच्या तत्परतेमुळे शंभूचे प्राण वाचले. त्याला सध्या एसकेएमसीएचच्या बर्न वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपीच्या पत्नी छोटीला अटक केली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : हॉटेलच्या शेजारील झुडपात आढळला तरुणाचा मृतदेह; चिखलीतील घटनेनं पुणे हादरलं!

Gokul : शासननियुक्त चार संचालक कोण? गोकुळचा पडद्यामागचा खेळ सतेज पाटलांकडून संघर्ष मोर्चा सभेत उघड, राजकारणात खळबळ!

Maharashtra News Live Update: मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर पूर्णतः बंदी; महापालिका आयुक्तांचा आदेश

Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

Satej Patil: कोल्हापुरातून सत्तांतराचं बीज पेरलं गेलंय, २०२९ मध्ये महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार; सतेज पाटलांचा सरकाराला इशारा

SCROLL FOR NEXT