Crime News Saam Tv Marathi
देश विदेश

Shocking: बिहार हादरलं! पोलिसासोबतचा वाद टोकाला, विद्यार्थ्याला बंदुकीने मारहाण, हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले

Bihar Crime News: समस्तीपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकावर दारूच्या नशेत मजूर युवकाला मारहाण करून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याचा आरोप झाला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कॉलेजमध्ये तोडफोड केली.

Dhanshri Shintre

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील दलसिंहसराई परिसरात सोमवारी संध्याकाळी मोठा गोंधळ उडाला. जेव्हा एका पोलिस अधिकाऱ्यावर स्थानिक तरुणाला वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. ही घटना रामपूर जलालपूर येथील पीटीसी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात घडली. आरोपी पोलिस विधानसभा निवडणुकीच्या ड्युटीवर होता. घटनेच्या बातमीने संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने महाविद्यालयात जमले आणि पोलिस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आरोपी अधिकाऱ्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

पीडित मनीष कुमार हा वॉर्ड क्रमांक २१ मध्ये राहणाऱ्या चीना दास यांचा मुलगा असून, तो मजूर म्हणून काम करत होता आणि त्याला चार मुले आहेत. सोमवारी संध्याकाळी कॉलेज चौकात मनीष आणि पोलिस(उपनिरीक्षक) यांच्यात वाद झाला. त्या वेळी पोलिस अधिकारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वादानंतर पोलिसांनी मनीषला चौकात मारहाण केली आणि नंतर जबरदस्तीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेले. तिथे त्याने मनीषला काठीने आणि पिस्तूलच्या मारले असल्याचे सांगितले. या मारहाणीत मनीषाचा एक दात तुटला आणि पोलिस अधिकाऱ्याने त्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले, ज्यात मनीष गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच डीएसपी विवेक कुमार शर्मा आणि पोलिस स्टेशन अधिकारी मोहम्मद इर्शाद आलम आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमी मनीषला तत्काळ दलसिंहसराई उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्याला पुढील उपचारांसाठी सदर रुग्णालयात नेण्यात करण्यात आले. तथापि, त्याच्या कुटुंबाने त्याला खाजगी रुग्णालयात नेले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कॉलेज कॅम्पसमध्ये तोडफोड केली. ज्यात वसतिगृहातील टेबल, खुर्च्या, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मॉनिटर्सचे नुकसान झाले. परिस्थिती बिघडल्याने पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले. पोलिस सूत्रांच्या मते, आरोपी उपनिरीक्षकाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही आणि प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

SCROLL FOR NEXT