Bihar Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: राजकारणात खळबळ! बड्या राजकीय नेत्याची हत्या, छातीत झाडल्या ३ गोळ्या

Bihar Crime: बिहारमध्ये आरजेडीच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. छातीत ३ गोळ्या घालण्यात आल्या. गंभीर जखमी झालेल्या नेत्याने जागीच प्राण सोडले.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये आरजेडी युवा अध्यक्ष मंटू शाह यांची गोळ्या झाडून हत्या

  • आरोपींनी छातीत ३ गोळ्या झाडल्या

  • आरजेडी नेत्याचा जागीच मृत्यू

  • हत्येमागील कारण अद्याप उघड झालेले नाही

बिहारच्या मुजफ्फरनगरमध्ये सोमवारी सकाळी भयंकर घटना घडली. रामपुरहरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धर्मपूरमध्ये आरजेडीचा नेता आणि धर्मपूर पंचायत युवा अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंटू शाह (३५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या आरजेडीच्या नेत्याचे नाव होते. आरोपींनी आरजेडीच्या नेत्यावर ३ गोळ्या झाडल्या. या घटनेत आरजेडीच्या नेत्याचा जागीच मृत्यू झाला. या घनटेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

मंटू शाहच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मंटू शहा यांचा एक मित्र सकाळी त्यांना घराबाहेर बोलावण्यासाठी आला होता आणि ते त्याच्यासोबत घराबाहेर पडले. या घटनेनंतर कुटुंबाने त्याच मित्रावर हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी अद्याप या दाव्याला दुजोरा दिला नाही. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. हत्येच्या या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना ४ तास मृतदेह उचलण्यास नकार दिला. पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस घटनास्थळावर सीसीटीव्ही तपासत आहेत. ही हत्या नेमकी कुणी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. आरोपी आणि मंटू शाह यांच्यात आधी भांडण झाले असावे त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगार आणि मंटू शाह यांच्यात वाद आणि हाणामारी झाली. त्यानंतर आरोपींनी अंदाधुंद गोळीबार केला. मंटू शाह यांच्या छातीत ३ गोळ्या घुसल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या एफएसएल टीमने अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज देखील तपासले जात आहेत. हत्येमागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर ८ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Sheet Mask : तुम्ही चेहऱ्यावर शीट मास्क लावता? मग 'हे' ५ टॉप फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT