bihar Crime News
bihar Crime News saam tv
देश विदेश

Bihar News : बिहार हादरलं! वाढदिवसाची पार्टी करून घरी परतताना JDU नेत्याची गोळी झाडून हत्या; परिसरात खळबळ

Vishal Gangurde

Bihar Crime News : बिहारमधून धक्कादायक बातमी हाती आली आहे. बिहारमधील गया जिल्ह्यातील जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुनील कुमार सिंह यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सुनील कुमार यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. सुनील कुमार यांच्या हत्येने लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुनील कुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयात एकच टाहो फोडला. सत्ताधारी नेते सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू नेत्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी मृताचे नाव सुनील कुमार सिंह असल्याचे सांगितले. तसेच सुनील हे जेडीयूचे जिल्हा उपाध्यक्ष आहे.

पोलिसांनी (Police) हल्लाखोरांचा तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपींना पकडू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. सुनील कुमार सिंह यांचं शव ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठविल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर

दरम्यान, बिहारमध्ये (Bihar) गुन्ह्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. छपरा जिल्ह्यात देखील दोन युवकांना बेदम मारहाण करून हत्येची घटना घडली होती. तर दुसरीकडे राजधानी पाटणामध्ये मध्यरात्री दरोडेखोरांनी चार लोकांची गोळी झाडून हत्या केली होती.वाढत्या गुन्ह्यामुळे बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Home Tips: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

SCROLL FOR NEXT