देश विदेश

Shocking: धक्कादायक! पैशांवरून टोकाचा वाद; महिलेने जेवणात मिसळलं विष, नवरा अन् सासऱ्याचा मृत्यू

Bihar Crime News: बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील आगरेर गावात धक्कादायक घटना घडली. सुनेने पती आणि सासरच्यांच्या अन्नात विष मिसळून हत्या केल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे.

Dhanshri Shintre

  • बिहारच्या रोहतास जिल्ह्यात सुनेने अन्नात विष देऊन सासरे व पतीची हत्या.

  • या घटनेत मेहुणा गंभीर आजारी, रुग्णालयात उपचार सुरू.

  • आर्थिक वादामुळे गुन्हा घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास.

  • आरोपी सून धनौतु देवी आणि तिच्या आईला पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली.

बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील आगरेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेनं जेवणात विष घालून सासरे आणि पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. विषारी जेवणामुळे घरातील मेहुणाही गंभीर आजारी पडला आहे. त्याच्यावर सासाराम येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी सून धनौतु देवीला अटक केली असून, तिच्या आईलाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

घटना कुठे घडली?

ही घटना बक्सर जिल्ह्यातील धनसोई पोलीस स्टेशन परिसरातील रामपूर गावातील रहिवासी बेचन चौधरी यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. बेचन चौधरी (४८) हे आपल्या दोन मुलांसह आगरेर येथे गवंडी काम करत राहत होते. त्याच्या मुलांची नावे विशाल कुमार (१९) आणि विकास कुमार (१४) असे आहे. कामावरून मिळणाऱ्या पैशांनी ते कुटुंबाचा पोट भरत असे.

नेमकं प्रकरण काय?

बुधवारी रात्रीच्या जेवणानंतर सर्वांना अचानक उलट्या आणि प्रकृती बिघडल्याची लक्षणे दिसली. यामध्ये बेचन चौधरी आणि त्यांचा मोठा मुलगा विशाल कुमार यांचा मृत्यू झाला. धाकटा मुलगा मात्र सध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

पैशांवरून वाद

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रोशन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एफएसएल(FSL) पथकाने जागेवरून पुरावे गोळा केले. चौकशीत असे समोर आले की घरातील सून धनौतु देवी आणि तिच्या पतीमध्ये पैशांवरून वाद होत होता. वारंवार पैशासाठी दबाव टाकल्याने सूडाच्या भावनेतून तिने अन्नात विष मिसळून सासरे, पती आणि मेहुण्याला खायला दिले.

सासाराम-२ चे एसडीपीओ कुमार वैभव यांनी माहिती देताना सांगितले की, प्रारंभीच्या चौकशीत विष देऊन हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. म्हणून आता या घटनेमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvas Paratha: नवरात्रीत बनवा उपवासाचा खमंग पराठा; रेसिपी वाचा

शरद पवारांच्या फोननंतर पडळकरांवर कारवाई होणार का? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेले गोळीबार प्रकरण, 11 संशयितांना पोलिसांनी केली अटक

Farmer Rasta Roko : शासनाच्या १२८ कोटीच्या जीआरची होळी करत रास्ता रोको; हेक्टरी ३५ हजार देण्याची मागणी

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

SCROLL FOR NEXT