Bihar son kills father over land dispute 
देश विदेश

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

Bihar son kills father over land dispute : बिहारच्या समस्तीपूरमध्ये जमिनीच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. 'दृश्यम' स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीला केलेला फोन आणि मोबाईल लोकेशनमुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Namdeo Kumbhar

बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका मुलाने जमीन आणि कौटुंबिक वादातून आपल्याच जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या केली. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने लोकप्रिय 'दृश्यम' चित्रपटातील युक्ती वापरून मोबाईल लोकेशन लपवण्याचा प्रयत्न केला. पण, गुन्ह्यानंतर पत्नीशी केलेल्या अवघ्या एका फोन कॉलने आणि मोबाईलच्या नेटवर्क लोकेशनने त्याची पूर्ण पोलखोल केली.

शेतकरी रघुवीर सहनी यांची त्यांच्याच राहत्या घरी कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी मुलगा शिवशंकर सहनी याला गुजरातमधील सूरत शहरातून अटक केली आहे.

२००० किमीचा प्रवास अन् 'दृश्यम' स्टाईल प्लॅन

आरोपी शिवशंकर गुजरातच्या सूरतमध्ये मजुरीचे काम करायचा. जमिनीचा वाद आणि कौटुंबिक भांडणातून त्याने वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी त्याने 'दृश्यम' चित्रपट पाहून पोलिसांना चकवा देण्याची योजना आखली. सूरत सोडण्यापूर्वीच त्याने आपला मोबाईल बंद केला, जेणेकरून पोलिसांना त्याची शेवटची लोकेशन गुजरातमध्येच दिसेल आणि त्याच्यावर कोणालाही संशय येणार नाही.

शिवशंकर ट्रेनने बिहारमध्ये आला आणि २६ जुलैच्या रात्री छुप्या मार्गाने आपल्या घरी पोहोचला. घराबाहेर झोपलेल्या वडिलांवर त्याने कुऱ्हाडीने वार करून त्यांचा जीव घेतला आणि घटनास्थळीच कुऱ्हाड फेकून तो पुन्हा गुपचूप सूरतला पळून गेला.

एकाच फोन कॉलने उघडे पाडले पितळ

हत्या केल्यानंतर शिवशंकरने कोणालाही संशय येऊ नये म्हणून पुन्हा सूरत गाठले. मात्र, वाटेत असताना त्याने काही वेळासाठी मोबाईल चालू केला आणि आपल्या पत्नीशी संवाद साधला. पोलिसांना जेव्हा हत्येचा संशय आला, तेव्हा त्यांनी घटनास्थळावरील मोबाईल डेटा आणि कॉल डिटेल्स खंगाळले. यामध्ये शिवशंकरच्या मोबाईलची लोकेशन घटनेच्या रात्री बिहारमधील पटोरी परिसरात दिसून आली, तर अवघ्या ३६ तासांनंतर ती पुन्हा सूरतमध्ये दाखवू लागली.

वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही आला नाही

वडिलांची हत्या झाल्यानंतरही शिवशंकर गावात अंत्यसंस्कारासाठी आला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सूरत गाठून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वतःच्या बापाची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात रवाना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील गर्जना मोर्चाला राज ठाकरे उपस्थित

मोठी राजकीय घडामोड! राहुल गांधींची ताकद वाढली, भाजपविरोधातील लढ्यात आणखी एका पक्षाची साथ, नेमकं झालं काय?

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT