Bihar Crime News Saam tV
देश विदेश

Crime News : धक्कादायक! कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं; ११ महिन्यांत ३० वेळा बलात्कार

Bihar Crime News : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात बीए विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील तरुणावर ११ महिन्यांत ३० वेळा अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. आरोपीसह ७ जणांवर गुन्हा दाखल असून पोलिस सखोल तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • बीए विद्यार्थिनीचा वारंवार अत्याचाराचा गंभीर आरोप

  • ११ महिन्यांत ३० वेळा अत्याचार केल्याचा दावा

  • आरोपीसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • पश्चिम चंपारण पोलिसांकडून तपास सुरू

  • महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बिहारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अधिकारी बनू इच्छिणाऱ्या बीएच्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या तरुणाने ११ महिन्यात ३० वेळा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने आणि तिच्या कुटुंबीयांनी तरुणासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सनवर आलमवर असे आरोपीचे नाव असून सिया मौला (बदलेलं नाव) असे पीडितेचं नाव आहे . सदर घटना पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतनमध्ये घडली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी विद्यार्थी एकाच कॉलेजमध्ये बीएच्या वर्गात शिकत होते. सनवरने सियाचा विश्वास संपादन करून तिच्याशी जवळीक साधली.

एके दिवशी सियाच्या घरी कोणीही नसताना संधी साधून सनवर तिच्या घरी घुसला. तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. १० ऑगस्ट २०२४ ते २६ मे २०२५ दरम्यान तिच्यावर ३० वेळा बलात्कार केला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले. तरुणीच्या राहणीमानावरून तिच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी खोलात जाऊन तिची विचारपूस केली.

कुटुंबियांना हा प्रकार समजताच त्यांनी तरुणाला जाब विचारला आणि तरुणीसोबत लग्न करण्याचे आश्वासन मागितले. सुरुवातीला तरुणाने होकार दिला मात्र नंतर तो मागे हटला. याप्रकरणानंतर संतापलेल्या पीडितेच्या आईने आणि पीडितेने संबंधित तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुणीने तक्रारीत म्हटले की, माझी आई मला अधिकारी बनवू इच्छित होती, मात्र सनवर आलमवरच्या कृत्याने माझी स्वप्न अधुरी राहिली असून मी कोलमडली आहे. त्याने माझ्यावर सलग ११ महिने ३० वेळा बलात्कार केला आणि माझ्या शारीरिक छळासोबत मासिक छळ सुद्धा केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून सनवर आलमवरसह त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT