Bihar Crime  Saamtv
देश विदेश

Bihar Pregnant Woman News: २० दिवसांनी आई होणार होती पण त्याआधीच.. पतीचा चेहरा पाहताच पत्नीने सोडला जीव; काय आहे प्रकरण?

Bhagalpur Pregnant Woman Died: दोन वर्षापूर्वी पल्लवी आणि गुड्डूने प्रेमविवाह केला होता, तसेच २० दिवसांनी ती आई होणार होती असेही सांगण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Bihar Crime News: हत्येच्या प्रयत्नात अटकेत असलेल्या पतीला पाहिल्यानंतर गर्भवती पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. तुरूंगात अटकेत असलेल्या पतीला ही महिला भेटायला गेली होती. ज्यानंतर अचानक ती बेशुद्ध झाली. यावेळी उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, भागलपूरच्या (Bhagalpur) घोघा गोविंदपूरच्या गुड्डू यादवचे दोन वर्षांपूर्वी पल्लवीसोबत लग्न झाले होते. त्यांनी प्रेमविवाह केला होता. पल्लवी आठ महिन्यांची गर्भवती होती. तिला डिलिव्हरीची २७ जून ही तारीख देण्यात आली होती. डिलीवरीच्या आधी ती कारा रुग्णालयात आपल्या पतीला भेटायला गेली होती. एका जमिनीच्या वादात गुड्डू गेल्या आठ महिन्यांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत होता.

यावेळी पतीला समोर पाहताच पल्लवी बेशुद्ध पडली. ज्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. तसेच तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Bihar Crime News)

दरम्यान, या घटनेनंतर महिलेच्या दिराने पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळेच ही घटना घडल्याचे सांगत आमच्या कुटूंबाची पुर्ण वाताहात झाल्याचे विक्की यादवने सांगितले आहे. प्रेम विवाहाचा झालेल्या या दुर्देवी शेवटाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT