Bihar assembly election result 2025 live updates  Saam TV marathi news
देश विदेश

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Bihar assembly election result 2025 live updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे, बिहारची जनता कुणाला कौल देणार? कोण होणार मुख्यमंत्री? नितिश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

Namdeo Kumbhar

बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

काँग्रेस मुस्लीम लीग माओवादी पक्ष झालाय; पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

जामिनावर असलेल्यांना जनता साथ देत नाही - PM नरेंद्र मोदी

'बिहारमधील विजयाचा अकोला भाजपकडून जल्लोष

बिहारमधील एनडीएच्या ऐतिहासिक विजयाचा अकोल्यात भाजपने जल्लोष केलाय. गांधी रोडवरील पक्षाच्या जिल्हा कार्यालयापासून गांधी चौकापर्यंत पक्षाने विजयी रॅली काढत बिहार मधील विजयाचा आनंद व्यक्त केलाय. यावेळी भाजपचे खासदार अनुप धोत्रे, यांच्यासह पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर आणि कार्यकर्ते उपस्थित होतेय.

Bihar : तेजस्वी यादव १२ हजार मतांनी आघाडीवर

तेजस्वी यादव १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. ते राघोपूर विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत.

बिहारच्या निकालानंतर कोल्हापुरात जल्लोष

बिहारच्या निवडणुकीत NDA ला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शिवाजी चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे. ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

Jalna : जालन्यात ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

बिहार निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळतोय. आज जालन्यामध्ये भाजप कार्यालयासमोर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे भरवत बिहार विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी देखील ठेका धरला

Nagpur : नागपुरात बिहार निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष

नागपुरात भाजपच्या विभागीय धंतोली कार्यालयाबाहेर भाजपकडून बिहार निवडणुकीचा जल्लोष

ढोल ताशा वाजवत पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Bihar Result : नाचता येईना,अंगण वाकडे; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

नाचता येईना,अंगण वाकडे,अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांच्या बिहार विधानसभा निकालावर केलेल्या विधानावरून टीका केली आहे.तसेच संजय राऊतांनी आराम करावा,असा सल्ला देत,बिहार पेक्षा एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा निकाल,असेल असा विश्वास देखील चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.

Tejasvi Yadav : आरजेडीचे तेजस्वी यादव पिछाडीवर 

आरजेडीचे तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत. राघोपूर विधानसभा मतदारसंघातून आरजेडी पक्ष पिछाडीवर आहे.

भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

Bihar Election Result Live: प्रशांत किशोर यांच्या पदरी निराशा, मोठा पराभव

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलानुसार, प्रत्येक पक्षाचा एकतरी उमेदवार आघाडीवर आहेत. पण परंतु प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करणाऱ्या जन सूरजसाठी निकाल अत्यंत निराशाजनक होते.

Bihar Election Result Live Updates : बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक, विरोधक ४० आताच

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीने मोठी आघाडी घेतली आहे. एनडीएने २०० जागांचा आकडा पार केलाय. तर दुसरीकडे महागठबंधन ३६ जागांवरच अडखळले

Bihar Election Result Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Bihar vidhan sabha election result 2025 live Update :

बिहारमध्ये एनडीएचे सरकार जवळपास येणार, हे निश्चित झाले आहे. आज संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात कार्यकर्तांना संबोधित कऱणार आहेत.

Bihar Election Results 2025 Live:  बिहारमध्ये एनडीएला यश, भाजपकडून देशभरात जल्लोष

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालं मोठं यश

एनडीएच्या विजयानंतर भाजपकडून देशभरात जल्लोष

भाजपने घोषणा केली की, आज दुपारी १ वाजता जिल्हापातळीवर विजयोत्सव केला जाईल

Bihar Election Results 2025 Live:  बिहारमध्ये भाजप प्रणित NDA ला यश, महाराष्ट्रातील नागपुरात जल्लोष

नागपूर -

बिहार निवडणुकीत NDA ला विजयी आघाडी मिळाली आहे. त्याबद्दल नागपुरात भाजप युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

भारत माता चौकात फटाके फोडले

भाजपला भरभरून मतदान केल्याबद्दल बिहारच्या जनतेचे मानले आभार

Bihar Election Results 2025 Live:  बिहारच्या जनेतेने पुन्हा एकदा विकासाला मत दिले - मुरलीधर मोहोळ

- बिहारच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी पुन्हा एकदा एनडीएच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला

- प्रगतीलाच लोक मत देतात त्यामुळे डबल इंजिनचे सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वातले बिहारचे सरकार यांनी 5 वर्षात जे काही काम केले मोठ मोठे प्रकल्प बिहारमध्ये आले. हे बिहारच्या जनतेने पाहिले आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेने एनडीएच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला

- मी बिहारच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन की पुन्हा एकदा विकासाला मत दिले आहे...

Bihar Election Results 2025 Live: भाजप सर्वात मोठा पक्ष, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?

बिहारमध्ये भाजप आता सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. निवडणुकीचा निकाल सुरू असतानाच बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री महेश्वर हजारी म्हणाले की, यावेळीही नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत आणि आमच्या एनडीए युतीलाही जोरदार विजय मिळत आहे.

Bihar election 2025 result LIVE update : पिक्चर अभी बाकी है - आरजेडीला कमबॅकची आशा

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला बहुमत मिळाले आहे. तेजस्वी यादव यांचा आरजेडी बराच मागे पडला आहे. दरम्यान, आरजेडी नेत्या सारिका पासवान यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्या म्हणाल्या, "अशा ६०-७० जागा आहेत जिथे आम्ही १००-२०० मतांनी मागे आहोत.

Bihar Election Result Live: भाजप सर्वात मोठा पक्ष

२४३ जागांचे सुरूवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप ८५ जागांवर आघाडीवर आहे, तर नितीश कुमार यांचा जेडीयू ७६ जांगावर आघाडीवर

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : दिग्विजय सिंह यांचा काँग्रेसला सल्ला

मला जे संशय होता तेच घडले. ६२ लाख मते कापण्यात आली आणि २० लाख मते जोडण्यात आली. त्यापैकी ५ लाख मते एसआयआर फॉर्म न भरता जोडण्यात आली. कापण्यात आलेल्या बहुतेक मते गरीब, दलित आणि अल्पसंख्याकांची होती. ईव्हीएमवर शंका आहे. काँग्रेसने आपल्या संघटनेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आजची निवडणूक रॅली आणि जाहीर सभांपेक्षा मतदान केंद्रावर सघन जनसंपर्काबद्दल आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव १२०० मतांनी पिछाडीवर

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव तब्बल १२०० मतांनी पिछाडीवर आहेत.

Bihar Election Result Live : चिराग पासवानची मुसंडी

सुरूवातीच्या कलांमध्ये चिराग पासवान यांना मोठी आघाडी मिळाली आहे. त्यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास, एलजेपीआर) २२ जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाने २९ जागा लढवल्या आहेत.

Bihar vidhan sabha election result live :  नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील - जितन राम मांझी

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री असतील, असा दावा जितन राम मांझी यांनी केला आहे. त्यांनी १६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

Bihar assembly election result live Update :  भाजपचे राणा रणधीर मधुबनमध्ये लवकर आघाडीवर

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : भाजपचे विद्यमान आमदार राणा रणधीर मधुबन मतदारसंघातून आघाडीवर आहेत. मधुबन विधानसभा मतदारसंघातून आठ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. आरजेडीने संध्या राणी यांना तिकीट दिले आहे. मधुबन मतदारसंघ हा एनडीए आघाडीचा बालेकिल्ला आहे. २००५ आणि २०१० मध्ये जेडीयूने येथे विजय मिळवला तर २०१५ आणि २०२० मध्ये भाजपने ही जागा जिंकली.

Bihar Election Result 2025 Live : तेजप्रताप यादव २ हजार मतांनी पिछाडीवर

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाला महुआ विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये महुआ मतदारसंघात तेज प्रताप २००० हून अधिक मतांनी मागे आहेत. तेज प्रताप यांचे मुख्य प्रतिस्पर्धी रामविलास पासवान लोजपाचे संजय कुमार सिंह आहेत. या ठिकाणी काटे की टक्कर होत आहे.

Bihar vidhan sabha Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

पहिल्या फेरीनंतर तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या उमेदवाराकडून जोरदार टक्कर मिळत आहे.

Bihar Election Result Live Updates: १० वाजेपर्यंतच्या कलानुसार JDU सर्वात मोठा पक्ष; ७६ जागांवर आघाडीवर

- सकाळी १० वाजेपर्यंत मतमोजणीचा कल समोर

- बिहार विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये जदयू सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसून आले.

- जदयू सध्या ६१ जागांवर आघाडीवर आहे

- तर भाजप ५६ जागांवर आघाडीवर आहे. 

- आरजेडी ३३ जागांवर आघाडीवर आहे. 

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : २४३ जागांचे कल हातात, कोणता पक्ष आघाडीवर?

Bihar assembly election result live Update : बिहारमधील सर्वच्या सर्व २४३ जागांचे सुरूवातीचे कल हातात आले आहेत. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे आकड्यावरून दिसत आहे. सुरूवातीच्या कलानुसार, एनडीए १६१ जागांवर आघाडीवर आहे. तर महागठबंधन ७८ जागांवर आघाडीवर आहे.

भाजप ६९

JDU ७६

आरजेडी ५९

काँग्रेस १६

लोकजनशक्ती पार्टी १२

Bihar election 2025 result LIVE update : बिहार मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या प्रश्न? भाजप प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले

Bihar assembly election result live Update : जनतेच्या जनादेशावर विश्वास आहे. गृहमंत्र्यांनी १६० जागा जिंकतील असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावर जयस्वाल म्हणाले, "आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहोत."

Bihar Election Result Live: भाजप सर्वात मोठा पक्ष, कोण किती जागांवर आघाडीवर?

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएने आघाडी घेतली आहे. २३१ जागांपैकी एनडीएचे उमेदवार १५३ जागांवर आघाडीवर आहेत. एनडीएने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. एनडीएमधून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपचे ८० उमेदवार आघाडीवर आहेत. तर नितिश कुमार यांच्या जेडेयूचे ६६ उमेदवार आघाडीवर आहेत. आरजेडी ५९ तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहेत.

Bihar vidhan sabha election result 2025 live Update :  तेज प्रताप यादव महुआ मतदारसंघातून आघाडीवर

Bihar assembly election result live Update : तेज प्रताप यादव यांनी पुन्हा एकदा महुआ मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तेज प्रताप हे राजदचे उमेदवार मुकेश कुमार रोशन यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : भागलपूरमधून काँग्रेसचे अजित शर्मा आघाडीवर

Bihar assembly election result live Update : भागलपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजित शर्मा आघाडीवर आहेत. बिहारमध्ये २० जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. सुरूवातीच्या कलांनुसार महाआघाडीतील काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राजद ५८ जागांवर आघाडीवर आहे.

Bihar election result live update : बिहार निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम

Bihar election 2025 result LIVE update : बिहार निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम झाला आहे. सन्सेक्स ३०० अंकानी घसरला आहे.

Bihar assembly election result live Update : एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडी?

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणीमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएने आघाडी घेतली आहे. २०४ जागांचे कल हातात आले आहेत. एनडीएने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. एनडीचे १३० उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधन फक्त ७० जागांवर आघाडीवर आहे.

Bihar assembly Election Result 2025 Live : एनडीएला मोठी आघाडी, महागठबंधन पिछाडीवर

एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील अंतर वाढत चाललं आहे. एनडीएने 86 जागांवर आघाडीवर घेतली आहे, तर महागठबंधन ५७ जागांवर पुढं आहे. १५० जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यामध्ये एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

Bihar election 2025 result LIVE update : बेगुसरायमध्ये कोण जिंकणार? सात जागांवर तगडी टक्कर

बेगुसराय जिल्ह्यातील सात विधानसभा जागांसाठी सुरुवातीचे कल समोर आले आहेत. सातही जागांवर अटीतटीची लढत दिसत आहे. हे काही जागांवर भाजप आणि जेडीयूचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर आरजेडी आणि सीपीआयचे उमेदवारही मजबूत पकड राखत आहेत.

बेगुसरायमध्ये कुंदन सिंग आघाडीवर आहेत. चेरिया बरियारपूरमध्ये अभिषेक आनंद आघाडीवर आहेत. बछवाडामध्ये सुरेंद्र मेहता आघाडीवर आहेत. तेघरामध्ये रजनीश सिंग आघाडीवर आहेत. मटिहानीमध्ये बोगो सिंग आघाडीवर आहेत. साहेबपूर कमलमध्ये लालन यादव आघाडीवर आहेत. बखरीमध्ये सूर्यकांत पासवान आघाडीवर आहेत. हे सुरुवातीचे ट्रेंड आहेत.

Bihar Vidhan Sabha Election Results 2025 LIVE Counting : सीमांचल प्रदेशात महागठबंधनला आघाडी

Bihar Election Results 2025 LIVE Counting : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सीमांचल प्रदेशात काटें की टक्कर सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये किशनगंज जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर चुरशीची लढत दिसून येत आहे. या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या या कलांमुळे महाआघाडीसाठी हा प्रदेश सकारात्मक निकाल देऊ शकतो, असे दिसतेय.

Bihar Election Result 2025 Live Updates:  सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए ५५ जागांवर आघाडीवर

मतमोजणी सुरू होताच सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए ५५ जागांसह आघाडीवर आहे. तर महागटबंधन आघाडी ४० जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Bihar Election Result 2025 Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

पोस्टल मतमोजणी संपली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळाली आहे. एनडीए ६० जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन फक्त ४० जागांवर आघाडीवर आहे. आता ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात होत आहे.

Bihar Election Result 2025 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आघाडीवर

बिहारमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे तसतसे सत्ता कुणाकडे जाणार हे निश्चित होईल.

 Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये तरुणांचे सरकार येईल, तेजस्वी यादव यांना विश्वास

महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सत्ता बदल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

 Bihar Election Result Live Updates : बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात पहिला कल येणार

बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे.

Bihar Election Result Live Updates : तेजस्वीचं सरकार येणार, राजद नेत्याला विश्वास

राज्यात तेजस्वी यादव यांचे सरकार येणार आहे. सर्वांचा सपोर्ट मिळाला आहे, असे राजद नेता विश्वनाथ यादव म्हणाले.

Bihar Election Result 2025 : एनडीएविरुद्ध जनतेचा रोष - पप्पू यादव

"जनतेने महाआघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. एनडीए आघाडीविरुद्ध लोकांमध्ये संताप होता आणि त्यांना बदल हवा होता."
पप्पू यादव

Bihar Election Result 2025 : सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार

सकाळी ८:०० वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल आणि त्यानंतर सकाळी ८.३० वाजता ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे) ची मोजणी सुरू होईल.

Bihar Election Result Live Updates : मतमोजणीपूर्वी नितीश कुमारांना आली नेहरूंची आठवण

मतमोजणीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे स्मरण केले. त्यांनी नेहरूंना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली."

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

बिहारमध्ये सत्ता कोणाची? निकालाचा महाफैसला! | Bihar election results

बिहारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचा आज फैसला होणार आहे... बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झालं होतं, पहिल्या टप्प्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 69.90 टक्के मतदान झालं... याचा फायदा कोणाला होणार? नितीश कुमार पुन्हा येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता स्थापणार हे आज स्पष्ट होईल... सकाळी मतमोजणी सुरू होईल, दुपारपर्यंत बिहारमध्ये कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल... बिहार निकालाचं महाकव्हरेज साम टीव्हीवर आज सकाळपासून पाहता येणार आहेत...

Exit Poll नुसार बिहार निवडणुकीत NDAला बहुमत?

बिहारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचा आज फैसला होणार आहे... बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झालं होतं, पहिल्या टप्प्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 69.90 टक्के मतदान झालं... याचा फायदा कोणाला होणार? नितीश कुमार पुन्हा येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता स्थापणार हे आज स्पष्ट होईल... सकाळी मतमोजणी सुरू होईल, दुपारपर्यंत बिहारमध्ये कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल... बिहार निकालाचं महाकव्हरेज साम टीव्हीवर आज सकाळपासून पाहता येणार आहेत...

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

nitish kumar vs tejashwi yadav : बिहार विधानसभा निवडणुकीचा शुक्रवारी निर्णय निकाल जाहीर होणार आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी आणि ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान घेतले. एकूण २४३ जागांसाठी ही निवडणूक लढली गेली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधन (आरजेडी, काँग्रेस, लेफ्ट) यांच्यात तीव्र स्पर्धा होती. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अभूतपूर्व राहिली. पहिल्या टप्प्यात ६५.०८% आणि दुसऱ्या टप्प्यात ६८.७६%, एकूण सरासरी ६७.१३%, जी १९५१ नंतरची सर्वोच्च आहे. महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा ९.९३% जास्त आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. एक्झिट पोल्सनुसार, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. अॅक्सिस माय इंडियानुसार, एनडीएला १२१-१४१ जागा, महागठबंधनला ९८-११८ जागा मिळू शकतात, तर आजच्या चाणक्यने एनडीएला १३०-१३८ जागा आणि महागठबंधनला १००-१०८ जागा भविष्यवाणी केली. दैनिक भास्करच्या अंदाजानुसार, एनडीएला १४५-१६० जागा मिळतील. प्राशांत किशोरांच्या जन सुराज पक्षाला फक्त ०-३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने विकास, रोजगार आणि स्थैर्यावर भर दिला, तर तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनने बेरोजगारी, स्थलांतर आणि जातीय समीकरणांवर हल्ला चढवला. ७४.२ कोटी मतदारांमध्ये ३९.२ कोटी पुरुष आणि ३५ कोटी महिला सहभागी झाल्या. निकालानुसार, नीतीश कुमारांची दहावी सत्ता किंवा तेजस्वींची सत्ता बदलाची शक्यता आहे. ही निवडणूक बिहारच्या भविष्याला आकार देणारी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

Crime News: घरातून उचलून नेत केलं लग्न; नंतर मुलीचा नग्न व्हिडिओ बनवत केला व्हायरल, इन्फ्लूएंसरचं अमानवी कृत्य

SCROLL FOR NEXT