Truck Carrying Train Saam TV
देश विदेश

Truck Carrying Train: ट्रेनचा डब्बा घेऊन जाताना ट्रकचे दोन तुकडे; पाहा विचित्र अपघाताचा VIDEO

Truck Carrying Train Coach Accident: एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रकचा पुढील भाग आणि मागील भाग दोन्ही वेगवेगळे झालेत.

Ruchika Jadhav

Bihar Accident News:

ट्रेनने तुम्ही सर्वांनीच प्रवास केला आसेल. ट्रेनमधून फक्त व्यक्तीच नाही, तर विविध वस्तू आणि माल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवला जातो. यामध्ये तेल, धान्य, अवजड वाहने, लोखंडाच्या अवजड वस्तू असतात. मात्र तुम्ही कधी एखाद्या ट्रेनचा डब्बा ट्रकवर उचलून नेताना पाहिलंय का? बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक ट्रक चक्क ट्रेनचा भलामोठा डब्बा घेऊन चालला होता. काही अंतरावर आल्यावर भागलपूरमध्ये या ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रेनच्या वजनामुळे ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे वाहनचालकाचे ट्रकवकील नियंत्रण सुटले. ट्रकवर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाला.

अपघातात ट्रक थेट रेलिंगला धडकला. रेलिंगला धडकून ट्रकचा पुढील भाग देखील तुटला आणि बाजूला पडला. भागलपूरच्या उल्टा शहरात ही घटना घडली आहे. परिसरात जास्त वाहनांची गर्दी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रकचा पुढील भाग आणि मागील भाग दोन्ही वेगवेगळे झालेत. त्यात गावी जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनचा एक डब्बा ट्रकच्या वर आहे. झालेला अपघात पाहण्यासाठी येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT