Bihar News Saam tv
देश विदेश

Shocking : हॉटेलमधील अन्न खात असाल तर सावधान! मंचुरियन आणि पनीर कढाई खाऊन एकाचा मृत्यू, दोघे गंभीर; नेमकी घटना काय?

Bihar News : बिहारमधील भाबुआ येथे हॉटेलमधील अन्न खाल्ल्यानंतर एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मित्रांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हॉटेल सील करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • हॉटेलमधील मंचुरियन आणि कढाई पनीर खाऊन तरुणाचा मृत्यू

  • मित्रांची प्रकृती गंभीर

  • विषबाधेचा संशय

  • पोलिस तपास सुरू

तुम्हीदेखील हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खात असाल तर सावधान! एका तरुणाचा मंचुरियन आणि कढाई पनीर खाल्ल्याने मृत्यू झाला आहे, तर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर हॉटेलमधील अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सदर घटना बिहारमधील भाबुआ येथे एका रेस्टॉरंटमध्ये घडला आहे. या प्रकरणी हॉटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विशाल कुमार असे आहे, तर त्याचा धाकटा भाऊ विनायक आणि मित्र देवराज गंभीर आहेत. विशाल आणि त्याचे मित्र बिहारमधील भाबुआ येथे एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेले. तिथे एका हॉटेलमध्ये त्यांनी मंचुरियन आणि कढाई पनीर ऑर्डर केलं. जेवण झाल्यावर विशाल आणि त्याचे मित्र घरी गेले.

त्याच रात्री उशिरा विशालला आणि त्याच्यासोबत जेवायला गेलेल्या मित्रांना त्रास होऊ लागला. विशालला रात्री उलट्या होऊ लागल्या आणि प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पहाटे साडेचार वाजता भाबुआ रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले.

डॉक्टरांनी म्हटले की, विशालला खाण्यातून विषबाधा झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली आणि वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. विशालसोबत असलेल्या त्याच्या मित्रांची देखील तब्येत खालावली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी विशालच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हॉटेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलसांनी या हॉटेलला सील केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT