NEET Exam Scam Latest Updates Saam TV
देश विदेश

NEET Exam Scam : NEET पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, पाहा VIDEO

Satish Daud

संदीप भोसले, साम टीव्ही लातूर

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात येणाऱ्या नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहचले आहेत. पेपरफुटीप्रकरणी लातूरमधील दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून दुसरा शिक्षक फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

जलील पठाण असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे. तर दुसरा शिक्षक संजय जाधव हा फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. 'नीट'च्या निकालानंतर देशभरात सध्या गोंधळाचे वातावरण असून या परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

पेपर फोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून तपास सीबीआय आणि ईडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानंतर बिहार, पंजाब, गुजरात आणि हरियाणा राज्यातील पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रीय झाली आहे. महाराष्ट्रातही एटीएसच्या पथकाने नीट परीक्षा घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शनिवारी एटीएसच्या पथकाने लातूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र, तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाइलवर हॉलतिकिट आणि काही आर्थिक व्यवहारांचे संदर्भ आढळून आले. त्या माहितीच्या आधारे दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याशिवाय नांदे आणि दिल्ली येथील आणखी दोन जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. या संशयित आरोपींकडून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पेपर फोडण्यासाठी २० ते ३० लाखांपर्यंतचा व्यवहार करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT