Manasvi Choudhary
चेहऱ्यावर काळे डाग, डार्क स्पॉट आणि खाज सुटण्याची समस्या सामान्य असली तरी त्रासदायक वाटते.
अनेकदा हा त्रास महिनोमहिने सुरूच असतो म्हणून माहिला पार्लरमध्ये ट्रिंटमेंटसाठी जातात. मात्र तुम्हाला माहितीये का? घरगुती गोष्टींनी तुम्ही यावर सोपा उपाय करू शकता.
कापूराचा सोपा उपाय तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कोरफड जेल, बेसन, मध आणि मुलताना माती यामध्ये कापूर मिक्स करून चेहऱ्याला लावा.
कापूराचा हा उपाय केल्याने चेहऱ्याच्या समस्या कमी होतात. चेहऱ्यावरील काळे डाग, खाज सुटण्याची समस्या कमी होते.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूरची बारीक पावडर करा. ही पावडर कोरफड जेल, मध, बेसन किंवा मुलतानी माती या फेसपॅकमध्ये मिक्स करा.
कापूरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात यामुळे चेहऱ्यासाठी गुणकारी मानले जातात.
येथे दिलली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.