Chhattisgarh Assembly Election 2023 Saam Tv
देश विदेश

Mahadev App : छत्तीसगडचे CM भूपेश बघेल यांना मोठा दिलासा; महादेव अॅप प्रकरणात असीम दासने फिरवली साक्ष

Bhupesh Baghel : छत्तीसगडचे CM भूपेश बघेल यांना मोठा दिलासा; महादेव अॅप प्रकरणात असीम दासने फिरवली साक्ष

Satish Kengar

Mahadev App Case Accused Statement : 

कथित महादेव अॅप घोटाळा प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी असीम दास याने न्यायालयात आपलीशी साक्ष फिरवली आहे. तो म्हणलं आहे की, बघेल यांच्याविरुद्धच्या आरोपांवरील विधान असलेल्या कागदावर त्याला जबरदस्तीने सही करण्यास लावले.

तुरुंगातून ईडीच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटले आहे की, आपल्याला फसवले गेले आहे आणि आपण कोणत्याही नेत्याला पैसे पाठवले नाहीत. त्यांना इंग्रजी येत नसतानाही अधिकार्‍यांनी इंग्रजीत लिहिलेल्या निवेदनावर सही करण्यास भाग पाडल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तत्पूर्वी, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी असीम दास आणि पोलीस हवालदार भीम सिंह यादव यांना अटक करण्यात आली होती. दास याने आता आपले वक्तव्य मागे घेतले आहे. महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने हा धक्कादायक आरोप करत चौकशीची मागणी केली होती. निवडणूक निधीसाठी राजकारण्यांना पैसे पोहोचवल्याचा आरोप दास याच्यावर आहे. (Latest Marathi News)

बघेल यांनी आपल्याविरुद्ध कट रचल्याचा केला होता आरोप

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या प्रकरणावरून बरेच राजकारण झाले होते. यावरून भाजपने बघेल यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. भूपेश बघेल यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत ईडी आणि भाजप आपल्या विरोधात कट रचत असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, ईडीने सांगितले होते की 2 नोव्हेंबर रोजी रायपूरमधील महादेव बेटिंग अॅपशी जोडलेल्या कॅश कुरिअरमधून 5.39 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. हा पैसा काँग्रेसच्या निवडणूक प्रचारासाठी आणल्याचे सांगण्यात आले. विशेषत: हे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी होते. भूपेश बघेल यांनी अॅप प्रवर्तकांकडून आतापर्यंत 500 कोटींहून अधिक रक्कम घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले होते की, या अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिले होते. यानंतर यावरून वाद सुरू झाला. केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर बंदीही घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT