Cancer Treatment to Become Cheaper Saam Tv
देश विदेश

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, १३७ औषधांच्या किमती झाल्या कमी

Cancer Treatment to Become Cheaper: कॅन्सरच्या रुग्णांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जवळपास १३७ औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत.

Priya More

कॅन्सरच्या रुग्णांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला. कॅन्सरशीसंबंधित १३७ औषधांच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील व्यापारी नफा निश्चित केल्यामुळे औषधांच्या किमतीत मोठी घट झाली. रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने सांगितले की, या १३७ औषधांचे नवीन सुधारित दर ९ नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. त्याचसोबत या निर्णयामुळे ग्राहकांची अंदाजे वार्षिक ३,५०२.३१ कोटी रुपयांची बचत होईल.

डीजीएचएस अंतर्गत गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनंतर कॅन्सरच्या औषधांवरील व्यापारी नफा निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. रसायन आणि खते मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या १३७ औषधांवरील व्यापारी नफा निश्चित केला आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अंतर्गत गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने १७ ऑक्टोबर रोजी केलेल्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला. औषध विभागाने स्पष्ट केले की, किरकोळ विक्रेते, औषध वितरक आणि रुग्णालयांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये आणि वेबसाइटवर नवीन दरसूची ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या आदेशाच्या पालनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी राज्य औषध नियंत्रकांवर सोपवण्यात आली आहे.

आतापर्यंत ७६ औषध कंपन्यांनी १२१ औषधांच्या १,२२५ फॉर्म्युलेशन्ससाठी नवीन किमती सादर केल्या आहेत. यापैकी १,०३१ फॉर्म्युलेशन्सच्या किमतीत कपात झाली आहे. जवळपास ६०० ब्रँड्सच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक कपात झाली असून सर्वाधिक कपात ९६.४५ टक्के इतकी आहे. तसंच, टीएमआर अंतर्गत असलेली किंमत मर्यादा भारतात अद्याप लॉन्च न झालेल्या १०-१५ ओळखल्या गेलेल्या औषधांना ती उपलब्ध झाल्यावर लागू होईल.

सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरवर उपचार करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणत कमी झाल्या आहेत. आरपीजी लाईफ सायन्सेसच्या स्तनाच्या कर्करोगावरील कॅप्सूल, पॅल्बोप्रोची (पॅल्बोसायक्लिब १२५ मिग्रॅ) किंमत ४०,४२१.३३ रुपयांवरून २,७२० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, अर्विनकेअर फार्माच्या प्रोस्टेट कर्करोगावरील टॅब्लेट, अबिरॉनची (अबिराटेरोन ॲसिटेट २५० मिग्रॅ) किंमत ४१,२५० रुपयांवरून ३,२१८.२३ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

Sleep Health : ६ तासांची झोप पुरेशी आहे का? वयानुसार किती झोप आवश्यक

Garment Factory Fire: दिवाळीच्याच दिवशी गारमेंट फॅक्टरीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल

Maharashtra News Live Update: ऊस दरासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांचे बेमुदत रास्तारोको आंदोलन

Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट समुद्रात बुडाली, २१ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT