AIADMK Fifteen former MLAs and one former parliament member from Tamil Nadu join BJP  Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीआधी देशात मोठी उलथापालथ! 15 माजी आमदार आणि खासदारांनी केला भाजपमध्ये प्रेवश

Tamil Nadu News: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष दक्षिणेत मजबूत होताना दिसत आहे. राज्यातील 15 हून अधिक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे.

Satish Kengar

AIADMK Fifteen former MLAs and one former parliament member from Tamil Nadu join BJP:

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष दक्षिणेत मजबूत होताना दिसत आहे. राज्यातील 15 हून अधिक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. यामध्ये अनेक माजी आमदार, माजी खासदारांचा समावेश आहे. यातच आता दक्षिणेत भाजप आता स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.`

तामिळनाडूतील 15 माजी आमदार आणि एक माजी खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. सोमवारी या नेत्यांनी नवी दिल्लीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, यातील बहुतेक अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) आहेत. याआधी भाजप राज्यात एआयएडीएमकेसोबत मिळून निवडणूक लढवत होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, भाजप दक्षिणेत विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी एक सभाही घेतली. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर, 2014 लोकसभेच्या तुलनेत केरळमधील काही जागांवर भाजपची स्थिती 2019 मध्ये मजबूत झाली होती. मात्र या राज्यात पक्षाला लोकसभेची एकही जागा अद्याप जिंकता आलेली नाही. (Latest Marathi News)

याआधी कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. मात्र 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातून पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपसाठी दिलासादायक बातमी घेऊन आले. पक्षाच्या जागांची संख्या 2018 मधील 1 वरून 2023 मध्ये 8 वर पोहोचली आहे.

यातच अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (TDP) पुन्हा एनडीएमध्ये येऊ शकते. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. नायडू दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी; सुप्रीम कोर्टाने जनहित याचिका फेटाळली

Nagpur Accident: भरधाव कारमध्ये रेलिंग आरपार घुसली; भीषण अपघातात एक ठार, दोघे गंभीर

Psoriasis Disease: हिवाळ्यात चेहऱ्यावर लाल डाग येतात? जाणून घ्या कशी घ्यायची काळजी

Viral Video: खरा मुंबईकर! वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी काढला हटके मार्ग; VIDEO होतोय तूफान व्हायरल

Rohit Pawar News : धक्कादायक! रोहित पवारांचा निसटता विजय, लीड कमी झाल्याच्या धक्क्याने कार्यकर्त्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT