Big breaking news mayawati announced bsp will fight alone in loksabha 2024 Election  Saam TV
देश विदेश

Political News: 'इंडिया आघाडी'च्या मुंबईतील बैठकीआधीच मोठी राजकीय घडामोड; मायावतींनी घेतला मोठा निर्णय

Latest Political News: आगामी लोकसभा 2024 निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे.

Satish Daud

Latest Political News: आगामी लोकसभा 2024 निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. भाजपसह एनडीएला धक्का देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची उभारणी केली आहे. उद्या मुंबईत इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक आहे. मात्र, या बैठकीच्या एक दिवस आधीच मोठी घडामोड घडली आहे. (Latest Marathi News)

बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी आज (बुधवारी) एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणुकीसाठी बसपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नसून, स्वबळावरच या निवडणुका लढवणार असल्याचे मायवतींनी जाहीर केले आहे.

मायावतींनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. विरोधकांच्या एकजुटीला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. विषेश बाब म्हणजे मायावती इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, मायावतींनी या चर्चांचं खंडण करत आज आपला जाहीर केला आहे.

मायावती यांनी आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

एनडीए आणि इंडिया आघाडी हे दोन्हीही पक्ष गरीबांच्या विरोधात असून ते जातीयवादी सुद्धा आहेत. दोन्ही पक्ष फक्त धनवान सेठ समर्थक असून त्यांची धोरणे ही भांडवलशाहीची आहे. या धोरणांविरोधात बसपा सतत संघर्ष करत असून त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे युतीच्या खोट्या बातम्या पसरवू नका, असं मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उद्या मुंबईत इंडिया आघाडीची बैठक

केंद्रातील मोदी सरकारविरोधात उद्या इंडिया आघाडीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाली असून आघाडीतील बड्या नेत्यांनी मुंबईत दाखल होण्यास सुरूवात केली आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत लोगोनंतर इंडिया आघाडीच्या समन्वयक पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT