Amul Milk Price Hike Saam TV
देश विदेश

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

Amul Milk And Mother Dairy Milk Price Hike: अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या दुधाच्या दरामध्ये २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ताजे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • अमूल दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ

  • मदर डेअरी दुधाच्या दरात देखील वाढ

  • १ लिटरमागे २ रुपयांची वाढ

  • १४ मेपासून दुधाचे नवे दर लागू

महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. दूधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमूल दूध आणि मदर डेअरीच्या दुधामध्ये प्रति लिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. दोन्ही कंपनीने देशभरात दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमूलचे संचालन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन या कंपनीनुसार, जनावरांच्या चाऱ्याच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या विविध दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १ ते ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर १४ मे २०२६ पासून लागू होणार आहेत. मे २०२५ नंतर दुधाच्या दरात झालेली ही पहिलीच दरवाढ आहे. ही दरवाढ सरासरी २.५ ते ३.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे जी सर्वसाधारण अन्नधान्य महागाई दरापेक्षा कमी आहे.

तसंच कंपनीने असे देखील सांगितले की, दूध उत्पादनाचा खर्च सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात पशुखाद्य, दूध पॅकेजिंग फिल्म आणि इंधनाच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्यामुळेच दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमूल कंपनीनंतर मदर डेअर कंपनीने दूधाच्या दरामध्ये प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली असल्याची घोषणा केली. ही दरवाढ १४ मेपासून लागू होणार आहे. मदर डेअरीने परिपत्रक काढत सांगितले की, गेल्या वर्षात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या दरामध्ये ६ टक्के वाढ झाली असून ग्राहकांवरील भार कमी करण्याचे सर्व प्रयत्न करून ही दरवाढ करण्यात आली आहे.

अमूल दूधाचे दर -

अमूल फ्रेश (५०० मिली) - आधी २८ रुपये, आता २९ रुपये

अमूल फ्रेश (१ लिटर) - आधी ५५ रुपये, आता ५७ रुपये

अमूल शक्ती (५०० मिली) - आधी २९ रुपये, आता ३० रुपये

अमूल गोल्ड (५०० मिली)- आधी ३१ रुपये, आता ३२ रुपये

अमूल ए२ म्हशीचे दूध (१ लिटर) - आधी ६३ रुपये, आता ६६ रुपये

अमूल गायीचे दूध (५०० मिली) - आधी ३४ रुपये, आता ३५ रुपये

अमूल स्लिम अँड ट्रिम (५०० मिली)- आधी ३७ रुपये, आता ३९ रुपये

मदर डेअरीच्या दूधाचे दर -

बल्क वेंडेड मिल्क - आधी ५६ रुपये, आता ५८ रुपये

फुल क्रीम मिल्क - आधी ७० रुपये, आता ७२ रुपये

टोन्ड मिल्क - आधी ५८ रुपये, आता ६० रुपये

डबल टोन्ड मिल्क- आधी ५२ रुपये, आता ५४ रुपये

गाईचे दूध - आधी ६० रुपये, आता ६२ रुपये

प्रो मिल्क - आधी ७० रुपये, आता ७२ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे बंधूंचा 26 जुलैला संयुक्त मोर्चा

Thursday Horoscope : घरात वाद होतील, ५ राशींच्या व्यक्तींना कामात यश मिळेल; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Health Care : जांभई आल्यावर डोळ्यांतून पाणी का येते? जाणून घ्या ६ वैज्ञानिक कारणे

मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही; अण्णा हजारेंचं थेट पीएम मोदींना पत्र

विधानसभेत गदारोळ; आमदारावर मार्शलची कारवाई, जबरदस्तीने बाहेर नेले

SCROLL FOR NEXT